Navneet Rana and Ravi Rana recite Hanuman chalisa in Delhi Dainik Gomantak
महाराष्ट्र

राणा दांपत्याने दिल्लीत केले हनुमान चालीसाचे पठण

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालत नाही.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात हनुमान चालिसाचे पठण केले. यानंतर त्यांनी मंदिरात पूजा केली. (Navneet Rana and Ravi Rana recite Hanuman chalisa in Delhi)

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना नवनीत राणा म्हणाल्या की, राणा दाम्पत्य कोणाच्याही रिमोट कंट्रोलने चालत नाही, अगदी भाजपच्याही नाही. महाराष्ट्रातील जनतेला उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी आज आम्ही हनुमान चालीसाचे पठण केले आहे. मी तुरुंगात दररोज 101 वेळा हनुमान चालिसाचे पठण केले होते.

खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा सकाळी 8.30 वाजता त्यांच्या घरापासून पायी मंदिराकडे जायला निघाले. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुंबईत सभा आहे. जनतेला उद्धव ठाकरेंपासून मुक्त करण्यासाठी आज आम्ही हनुमान चालीसाचे पठण केले, असे नवनीत यांनी सांगितले.

राणा दाम्पत्याला 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती

विशेष म्हणजे, खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी गेल्या महिन्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा वाचण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना 23 एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. पुढे 5 मे रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: ज्येष्ठ कोंकणी साहित्यिक मीना काकोडकर यांचे निधन!

Goa Drugs Case: गोव्यात डीजे रशियन महिलेकडे सापडले 17 लाखांचे अंमलीपदार्थ! छाप्यात मिळाले नव्या प्रकारचे ड्रग्ज

Zuari Accident: दुर्दैवी! नवीन झुआरी पुलावर झालेल्या दुचाकींच्या अपघातात एकाचा मृत्यू; अतिवेगाने गाडी चालवल्याबद्दल चालकास अटक

Romi Konkani: रोमी कोंकणी, मराठी वादावर दत्ता नायकांचे मोठे विधान! पहा...

Goa Congress: ‘इफ्फी’ म्हणजे चरण्याचे कुरण! देशी महोत्सवात पतन झाल्याचे काँग्रेसचे घणाघाती आरोप

SCROLL FOR NEXT