Nashik Accident Video | Shirdi Bus Accident  Twitter
महाराष्ट्र

Shirdi Bus Accident Video: नाशिकमध्ये खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात, दहा जणांचा मृत्यू

नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ हा अपघात झाला.

गोमन्तक डिजिटल टीम

नाशिकमध्ये खाजगी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच, अनेक प्रवासी जखमी झाले असून, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. नाशिक-सिन्नर शिर्डी मार्गावरुन जात असताना पाथरेजवळ हा अपघात झाला. बसमधील इतर 17 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सिन्नर ग्रामीण रुग्णालय आणि सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (Nashik Accident Ten passengers died)

मुंबई कडून शिर्डीकडे जाणारी खाजगी बस आणि शिर्डी कडून सिन्नरकडे जाणारा मालट्रकाची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. पाथरे शिवारातील ईशानेश्वर मंदिराच्या कमानीजवळ सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातात 08 महिला आणि पुरुष तर 02 मुलांचा मृत्यू झाला आहे. तर 35 ते 40 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा अपघात इतका भीषण आहे स्वत: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याची दखल घेत मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

बसमधील इतर 17 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना सिन्नर ग्रामीण रुग्णालय आणि सिन्नर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दरम्यान, या अपघाताचा एक व्हिडिओ समोर आला असून, बसचा पूर्णपणे चक्काचूर झाला आहे. प्रवासी जखमी असून जखमींना सिन्नर आणि नाशिक येथील रुग्णालयात उपचाराकरता दाखल करण्यात आल्याची माहिती देखील मिळाली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: "पाऊण तास...", मंत्री ढवळीकरांनी सांगितला जुन्या मखराचा थरारक अनुभव; उलगडली कामाक्षी मंदिरातील अनोखी परंपरा

'आधी निवडणूक जिंकून दाखवा, लोकांची दिशाभूल करून मनोज परबांनी राजकीय पोळी भाजू नये'; मंत्री नीळकंठ हळर्णकर

Heart Health: स्क्रिनच्या अतिवापरामुळे वाढतोय हृदयविकाराचा धोका! वाचा काय आहे डिजिटल युगातील 'Heart Attack'

उद्धवस्त रनवे आणि जळालेल्या इमारती विजय वाटत असेल तर त्यांनी त्याचा आनंद घ्यावा; 3 मिनिटांत भारताने पाकच्या खोटेपणाचा बुरखा टराटरा फाडला Watch Video

Goa University: गोवा विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकाचोरीचे पुढे काय झाले?

SCROLL FOR NEXT