महाराष्ट्र

दुर्मिळ घटना! दारू पिऊन घेतल्या व्हायग्राच्या गोळ्या, नागपुरातील 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनमध्ये याबाबत माहिती प्रकाशित करण्यात आली आहे.

Pramod Yadav

एका दुर्मिळ आणि वेगळी घटना समोर आली आहे. दारू पिऊन दोन व्हायग्राच्या गोळ्या घेतल्याने नागपुरातील एका 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशी बातमी news.au.com ने दिली आहे. जर्नल ऑफ फॉरेन्सिक अँड लीगल मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा हवाला देत ही बातमी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

केस स्टडीमध्ये प्रकाशित केलेल्या माहितीनुसार, नागपुरातील 41 वर्षीय व्यक्ती हॉटेलमध्ये मैत्रिणीला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्याने व्हायग्राच्या सिल्डेनाफिल नावाच्या दोन (50mg) गोळ्या घेतल्या. या व्यक्तीने गोळ्या घेण्यापूर्वी दारूचे सेवन केल्याचे वैद्यकीय अहवालातून समोर आले आहे.

दुसऱ्या दिवशी सकाळी या व्यक्तीला अस्वस्थता जाणवू लागली. त्याला उलट्याही होत होत्या. सोबत असणाऱ्या महिलेने त्याला रूग्णालयात जात असताना त्याने वैद्यकीय सल्ला घेण्यास नकार दिला. यापूर्वी देखील आपल्याला असा त्रास झाल्याचे त्याने तिला सांगितले.

दरम्यान, त्याची प्रकृती जास्तच बिघडायला लागल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. अभ्यासानुसार, सेरेब्रोव्हस्कुलर हॅमरेजमुळे त्या माणसाचा मृत्यू झाला असे सांगितले जात आहे. यामध्ये मेंदूला ऑक्सिजन पुरवठा कमी होतो.

विशेष म्हणजे या व्यक्तीचा पूर्वीचा वैद्यकीय किंवा शस्त्रक्रियेचा कोणताही इतिहास नाही. मैत्रिणीसोबत तो हॉटेलच्या एका खोलीत राहत होता; त्याने रात्री सिल्डेनाफिलच्या 2 गोळ्या (प्रत्येकी 50 मिग्रॅ) आणि दारूचे सेवन केले होते.

शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांना त्याचे 300 ग्रॅम रक्त गोठलेले आढळले. दारू आणि औषधांचे मिश्रण तसेच उच्च रक्तदाबामुळे त्याचा मृत्यू झाला असे अहवालात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

National Education Policy Goa: पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 10 वी अन् 11वीतही 'NEP' लागू होणार! मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Goa Assembly Three Day Session: सहा महिन्यांचा हिशेब ३ दिवसांत! विरोधी पक्षनेत्यांची टीका, 31ऑगस्‍ट ते 2 सप्‍टेंबर अल्प कालावधीचे अधिवेशन

Student Protest Firing Allegations: 'गृहमंत्र्यांनीच दिला आंदोलकांवर गोळीबाराचा आदेश!' लोकसभेत परीक्षा दुरुस्ती विधेयक मंजूर, विरोधी पक्षनेत्यांच्या आरोपाने संसदेत गदारोळ

Goa liquor Smuggling In Telangana: गोवा-तेलंगणा हवाई मद्यतस्करीचा पर्दाफाश; 98 महागड्या बाटल्या जप्त, 2 जण ताब्यात, तपास सुरू

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

SCROLL FOR NEXT