'mumbaiwinter' is trend memes on Twitter Dainik Gomantak
महाराष्ट्र

'#mumbaiwinter' होतेय ट्रेंड, ट्विटरवर मीम्सचा महापूर

मुंबईकरांना पावसापासून दिलासा मिळाला असतानाच पहाटेच्या गुलाबी थंडीचा तडाका बसला आहे.

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा

मुंबई: सोमवार आणि मंगळवारची सकाळ मुंबईकरांसाठी (Mumbai) सर्वात थंड सकाळ ठरली. 10 जानेवारी रोजी सकाळी शहराच्या तापमानात 13 अंश सेल्सिअसची घट नोंदवली गेली. मुंबईतील अनेक भागात अवकाळी पावसामुळे तापमानात घट झाली आहे.

भारतीय हवामान विभागाच्या ( IMD) अहवालानुसार, 10 जानेवारी रोजी सकाळी तापमान 13.2 अंश सेल्सिअस होते, तर कुलाबा वेधशाळेच्या अहवालानुसार किमान तापमान 15.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होऊ शकते, असेही आयएमडीच्या अधिकाऱ्याने सांगितले.

हवामानातील (Maharashtra Weather Updates) या बदलामुळे मुंबईकर संभ्रमात पडले आहेत. डिसेंबरमध्ये उत्तर भारतीय थंडीचा आनंद लुटत असतानाच मुंबईत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. डिसेंबरच्या मध्यावर मान्सूनने अचानक मुंबईला आपल्या कवेत घेतले. आता मुंबईकरांना पावसापासून दिलासा मिळाला असतानाच पहाटेच्या गुलाबी थंडीचा तडाका मुंबईकरांना बसला आहे.

मुंबईतील लोक गरम कपड्यांमध्ये शेकोटीपुढे बसून काही स्वादिष्ट हिवाळी स्नॅक्स तयार करत असतानाकिंवा खातांना दिसत आहेत. नेटिझन्सनी या फोटोंचा मिम्स गेम सुरू केला आहे. सकाळी थंडी पडल्यानंतर ट्विटर वापरकर्त्यांनी मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात केली. चला या मजेदार मीम्सवर एक नजर टाकूया:

तरन्नुम आहुजा नावाच्या आणखी एका युजरने लिहिले, "मला मुंबईचा हिवाळा जितका आवडतो तितकाच मला काम पूर्ण करायला आवडेल... पण या थंडीमुळे हलताही येत नाही." अशा आशयाचे कॅप्शन युजर्सनी या मिम्सला दिले आहे.

राज्यात थंडीचा कडाका वाढला असून महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' असलेल्या महाबळेश्वर आणि पाचगणीमध्ये तापमानाचा पारा चांगलाच कमी काली घसरला आहे. आज पहाटे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक आणि लिंगमळा परिसरातील तापमानाचा पारा शून्य अंशाच्या जवळ गेला आहे. त्यामुळे महाबळेश्वरात दवबिंदू चे बर्फवृष्टीत रूपांतर झाल्याचे बघायला मिळाले. या थंडीचा फटका महाबळेश्वरमधील स्टॉबेरीच्या शेतीलाही बसला असल्याचे दिसत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT