Maharashtra Weather Updates
Maharashtra Weather UpdatesDainik Gomantak

Maharashtra Weather Updates: मुंबईत 10 वर्षांनंतर सर्वात कमी तापमानाची नोंद

आज कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Published on

देशातील इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही (Maharashtra) काहि दिवसांपासून हवामान बदलले आहे. त्यामुळेच जिथे लोकांना उकाडा जाणवत होता तिथे थंडी जाणवत आहे. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत सोमवारी किमान तापमान 13.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे या हिवाळ्याच्या हंगामातील सर्वात कमी तापमान होते. त्याच वेळी, कमाल तापमान(Weather Updates) 25.1 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यतापमानापेक्षा सहा अंशांनी कमी आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, मुंबईत गेल्या दशकातील जानेवारी महिन्यातील हे सर्वात कमी तापमान आहे. गेल्या जानेवारीमध्ये सर्वात कमी तापमान 14.8 अंश होते, तर 2020 मध्ये ते 11.4 अंश होते. 22 जानेवारी 1962 रोजी मुंबईत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती तेव्हा पारा 7.4 अंश सेल्सिअस होता. यापूर्वी, मुंबईत दशकातील सर्वात कमी किमान तापमान 29 जानेवारी 2012 रोजी 10.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले होते. दरम्यान, अवकाळी पावसामुळे थंडीही वाढत असून, गेल्या दशकातील जानेवारीत सर्वाधिक पाऊस झाला. त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra Weather Updates
महाराष्ट्रात वादळासह गारपिटीचा आयएमडीने दिला इशारा

वेस्टर्न डिस्टर्बन्सचा परिणाम

अनेक ठिकाणचे तापमान हिल स्टेशनसारखे झाले आहे. रविवारी रात्री महाबळेश्वरमध्ये किमान तापमान 10 अंशांवर पोहोचले होते. हवामान खात्याचे म्हणणे आहे की, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे हवामानावर बराच परिणाम झाला असून त्यामुळे पाऊस पडत आहे आणि तापमानातही घसरण होत आहे. त्यामुळे थंडी वाढली आहे. दुसरीकडे, पुढील दोन-तीन दिवस महाराष्ट्राच्या (Maharashtra Weather) विविध भागात विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तसेच गारपीट होण्याची शक्यता आहे.

Maharashtra Weather Updates
मुंबईत तिसऱ्या दिवशीही कोरोनाच्या नवीन रुग्णांमध्ये घट सुरूच

जाणून घ्या राज्यातील मोठ्या शहरांमधले हवामान

मुंबई

आज मुंबईत कमाल तापमान 27 तर किमान तापमान 13 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान कोरडं राहील.

पुणे

पुण्यात कमाल तापमान 29 तर किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

नागपूर

नागपुरात कमाल तापमान 25 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. येथे आकाश ढगाळ राहणार असून पावसाची शक्यता आहे.

नाशिक

नाशिकमध्ये कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान ७ अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे.

औरंगाबाद

आज औरंगाबादमध्ये कमाल तापमान 24 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश ढगाळ राहील.

याशिवाय आज कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, तेलंगणा आणि अरुणाचल प्रदेशात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com