Mumbai Sexual Assault Case Dainik Gomantak
महाराष्ट्र

Crime News: साडी नेसून आला, जादूटोण्याचा बहाणा केला, नवऱ्याच्या आजारपणाचा फायदा घेतला! किन्नराच्या वेशातील नराधमाचा महिलेवर लैंगिक अत्याचार

Mumbai Sexual Assault Case: मुंबईतील पवई परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली. किन्नर असल्याचे भासवून आणि साडी नेसून एका घरात घुसलेल्या नराधमाने एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला.

Manish Jadhav

Mumbai Sexual Assault Case: मुंबईतील पवई परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली. किन्नर असल्याचे भासवून आणि साडी नेसून घरात घुसलेल्या नराधमाने एका महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. घरात चाललेल्या आजारपणाचा आणि भीतीचा गैरफायदा घेत, करणी उतरवण्याच्या आणि आशीर्वादाच्या बहाण्याने आरोपीने हे नीच कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 19 ऑगस्ट रोजी घडली. 30 वर्षीय आरोपी अनिल शिंदे साडी परिधान करुन आणि किन्नराचा वेश धारण करुन पवईतील एका उच्चभ्रू सोसायटीत शिरला. सुरक्षा रक्षकाचा विश्वास संपादन करुन त्याने इमारतीत प्रवेश केला आणि थेट तिसऱ्या मजल्यावरील एका फ्लॅटचा दरवाजा ठोठावला. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पतीला ठीक करण्याचे आणि वाईट नजर उतरवण्याचे अमिष दाखवून त्याने घरातील महिलेचा विश्वास जिंकला. घरात प्रवेश करताच त्याने महिलेवर पाणी शिंपडले, तिला धमकावले आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. इतकेच नाही तर जाता जाता तो पीडितेकडून 2000 रुपये घेऊन पसार झाला.

पीडित महिलेने (Women) तातडीने पोलिसांत धाव घेतल्यानंतर पवई पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य ओळखून तपास सुरु केला. इमारतीतील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, आरोपी साडीतच एका रिक्षातून ठाण्याच्या दिशेने पळून जाताना दिसला. पोलिसांनी रिक्षाच्या क्रमांकावरुन चालकाचा शोध घेतला आणि माग काढत कळवा परिसरातून अनिल शिंदेला बेड्या ठोकल्या.

पोलीस तपासात आरोपी अनिल शिंदे आणि त्याचे कुटुंब किन्नर किंवा भिकाऱ्यांचे रुप धारण करुन मागण्याचे काम करत असल्याचे आणि आरोपीने पूर्वीही अशा प्रकारे वेश बदलून गुन्हे केल्याचे उघडकीस आले. सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्याच्यावर बलात्कार, धमकी आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत अतिरिक्त कलमे लावण्याची प्रक्रिया सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

Lucky Zodiac Signs: आर्थिक प्रगती आणि सुख-समृद्धीचे नवे योग! ऑक्टोबर महिन्यात 'हे' मोठे ग्रह बदलणार 4 राशींचे भविष्य, मिळणार बक्कळ पैसा

Son Appeal Rejected: वडिलांच्या मृत्युपत्राला आव्हान देणाऱ्या मुलाचे अपील फेटाळले; स्वतःच्या हिश्शाची जमीन मुलीला देण्याचा अधिकार कायम

KBC 18: पणजीतील 'पहिली चाहती' आजही संपर्कात; अमिताभ बच्चन यांच्या आठवणींनी रंगला 'केबीसी', अजित पुनियांनी जिंकले 12.5 लाख

Goa Politics: भाजप-मगो युती टिकणार? फोंड्यासह 12 जागांवर मगोचा दावा; जागावाटपावरून वाढला पेच

SCROLL FOR NEXT