NSG Commandos New Uniform: एनएसजी कमांडोंसाठी आता 'ब्रीदेबल' गणवेश, वाढत्या उष्णतेतही हवा खेळती राहणार

NSG commandos new uniform details: वाढत्या उष्णतेमुळे सुरक्षेच्या कामात तैनात असलेल्या कमांडोंना त्रास होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) त्यांच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
NSG Commandos New Uniform
NSG Commandos New UniformDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वाढत्या उष्णतेमुळे सुरक्षेच्या कामात तैनात असलेल्या कमांडोंना त्रास होत असल्याने राष्ट्रीय सुरक्षा दलाने (एनएसजी) त्यांच्या गणवेशात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या कमांडोंना आता हवा खेळती राहील, अशा कापडाचा गणवेश दिला जाणार आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेला एक कमांडो एप्रिलमध्ये विजयवाडा येथे बेशुद्ध झाला होता. त्या दिवशी तापमान सुमारे ४४ अंश सेल्सिअस होते. कमांडोने काळ्या रंगाचा गणवेश, त्यावर सुमारे सहा किलो वजनाचे बुलेटप्रूफ जॅकेट, डोक्यावर काळी टोपी आणि कमरेला शस्त्रे परिधान केली होती. त्यामुळे उष्णतेचा त्रास होऊन त्याला उष्माघाताचा सामना करावा लागला. या घटनेची एनएसजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली.

NSG Commandos New Uniform
Goa Smart Electricity Meters: 'स्‍मार्ट मीटर' रद्द करा, अन्यथा आंदोलन; अमित पाटकरांचा सरकारला इशारा, 15 दिवसांची दिली मुदत

सध्याचा काळा गणवेश मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतो. त्यात बुलेटप्रूफ जॅकेट आणि संपर्कासाठीची उपकरणे यांमुळे कमांडोंच्या शरीरावर अधिक ताण येतो. त्यामुळे गणवेश बदलण्याची शिफारस करण्यात आली.

नव्या गणवेशाच्या चाचण्या पूर्ण झाल्या असून, लवकरच त्यासाठी कापड खरेदी केले जाणार आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या काळापर्यंत कमांडोंना हा गणवेश मिळण्याची शक्यता आहे.

NSG Commandos New Uniform
Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

‘नायको’ची निवड

नव्या गणवेशासाठी नायलॉन आणि कापूस यांपासून तयार केलेल्या ‘नायको’ (Nyco) कापडाची निवड करण्यात आली आहे. या कापडातून हवा आणि ओलावा सहज बाहेर जाऊ शकतो. त्यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते. केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) कोब्रा कमांडोंकडूनही या कापडाचा वापर केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.