गोव्यासाठी प्रत्येकवेळी नवे टी-20 नेतृत्व; यंदा रणजी संघाबरोबर झटपट क्रिकेटसाठीही अभिनववर विश्वास

Goa Cricket Team New Captain: गोव्याचा सीनियर पुरुष संघ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग सातव्या मोसमात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
Goa Cricket Team New Captain
Goa Cricket Team New CaptainDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गोव्याचा सीनियर पुरुष संघ सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलग सातव्या मोसमात नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. यावेळी कठीण अशा एलिट ‘ड’ गटात संघाची कसोटी लागणार असून नवा कर्णधार अभिनव तेजराणा यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

महत्त्वाची बाब म्हणजे, २०२६-२७ मोसमात गोवा क्रिकेट असोसिएशनने (जीसीए) संघाचे कर्णधारपद विभागलेले नाही. रणजी स्पर्धेबरोबरच आता टी-२० स्पर्धेसाठीही डावखुरा फलंदाज अभिनव याच्यावर कर्णधार या नात्याने विश्वास दाखविला आहे. २०२५-२६ मोसमात स्नेहल कवठणकर रणजी स्पर्धेत कर्णधार होता, तर टी-२० स्पर्धेत नेतृत्व सुयश प्रभुदेसाई याच्याकडे होते. यावेळची गोव्याची टी-२० मोहीम कोलकता येथे शनिवारपासून (ता. १४) सुरू होईल.

२०२०-२१ पासून २०२५-२६ पर्यंतच्या सहा मोसमात गोव्याच्या टी-२० क्रिकेट संघाचे नेतृत्व सहा खेळाडूंनी भूषविले. या कालावधीत अमित वर्मा, एकनाथ केरकर, स्नेहल कवठणकर, दर्शन मिसाळ, दीपराज गावकर, सुयश प्रभुदेसाई यांच्याकडे गोव्याचे कर्णधारपद सोपविण्यात आले.

सगुण कामत सर्वाधिक सामन्यांत ‘नेता’

माजी अनुभवी डावखुरा फलंदाज सगुण कामत याने सर्वाधिक ३२ सामन्यांत गोव्याच्या टी-२० संघाचे नेतृत्व केले आहे. सहा विजय व २६ पराभव अशी त्याच्या नेतृत्वाखाली कामगिरी राहिली. गोव्याचा सफल फलंदाज स्वप्नील अस्नोडकर २१ सामन्यांत गोव्याच्या टी-२० संघाचा कर्णधार होता. संघाने सर्वाधिक नऊ विजय स्वप्नीलच्या नेतृत्वाखाली नोंदविले, तर १२ लढती गमावल्या.

Goa Cricket Team New Captain
Goa Smart Electricity Meters: 'स्‍मार्ट मीटर' रद्द करा, अन्यथा आंदोलन; अमित पाटकरांचा सरकारला इशारा, 15 दिवसांची दिली मुदत

डावखुरा अष्टपैलू दर्शन मिसाळ याने १२ टी-२० सामन्यांत कर्णधारपद भूषविले असून पाच विजय व सात पराभव अशी संघाने कामगिरी केली.

सुयश प्रभुदेसाई आठ सामन्यांत कर्णधार असताना गोव्याने पाच सामने जिंकले, तर तीन लढतींत पराभव पत्करला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.