VIDEO: 10-15 नव्हे तर तब्बल 500हून अधिक डॉल्फिन! मालवणच्या समुद्रात एकाच वेळी दिसला डॉल्फिनचा मोठा कळप; पाहा व्हायरल व्हिडिओ

Malvan sea dolphin viral video: कोकणचा निसर्ग, स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्रातील जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रातून एक आश्चर्यकारक दृश्य समोर आले आहे.
More Than 500 Dolphins Spotted Together In Malvan Sea
Malvan sea 500 dolphin viral videoDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

कोकणचा निसर्ग, स्वच्छ समुद्रकिनारे आणि समुद्रातील जैवविविधता नेहमीच पर्यटकांना आकर्षित करते. अशातच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या समुद्रातून एक आश्चर्यकारक दृश्य समोर आले आहे. समुद्राच्या पाण्यात एक-दोन नव्हे, तर तब्बल ५०० हून अधिक डॉल्फिन एकाच वेळी दिसल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. डॉल्फिनचा एवढा मोठा कळप समुद्रात एकत्र पोहताना पाहून निसर्गप्रेमी आणि पर्यटक थक्क झाले आहेत. या अद्भुत दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून, कोकणच्या सागरी सौंदर्याची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

समुद्रात एकाच वेळी दिसला डॉल्फिनचा मोठा कळप

मालवणच्या समुद्रात डॉल्फिनचा मोठा समूह एकत्र पोहताना दिसल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. समुद्राच्या निळ्याशार पाण्यात अनेक डॉल्फिन एकाच वेळी पाण्याच्या पृष्ठभागावर येताना आणि पुन्हा पाण्यात झेपावताना दिसत आहेत. साधारणपणे समुद्रात डॉल्फिनच्या छोट्या समूहांचे दर्शन घडते. मात्र, यावेळी ५०० हून अधिक डॉल्फिन एकत्र दिसल्याचा दावा करण्यात येत असल्याने या दृश्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

More Than 500 Dolphins Spotted Together In Malvan Sea
Goa Smart Meter: '15 दिवसांत स्मार्ट मीटरचा निर्णय मागे घ्या', अमित पाटकरांचा सरकारला आंदोलनाचा इशारा

'कोकणचा फोटोग्राफर' इन्स्टाग्राम पेजवरून व्हिडीओ व्हायरल

या अविस्मरणीय दृश्याचा व्हिडीओ 'कोकणचा फोटोग्राफर' या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. समुद्राच्या विस्तीर्ण परिसरात एकाच वेळी मोठ्या संख्येने डॉल्फिन हालचाल करताना या व्हिडीओत दिसतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे.

More Than 500 Dolphins Spotted Together In Malvan Sea
Girls Safety In Goa: सुरक्षित गोव्याची ओळख धोक्यात

मालवणच्या सागरी सौंदर्याची पुन्हा चर्चा

मालवण हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन परिसर असून, येथील समुद्रकिनारे आणि सागरी जैवविविधतेमुळे पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. डॉल्फिन दर्शन हा येथील पर्यटनाचा आकर्षक भाग मानला जातो. समुद्रात डॉल्फिनची उडी, त्यांची एकत्रित हालचाल आणि पाण्यातील खेळ पाहण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. आता शेकडोंच्या संख्येने डॉल्फिन एकाच ठिकाणी दिसल्याचा हा व्हिडीओ समोर आल्याने मालवणच्या समुद्राची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.