मुंबई लोकलच्या (Mumbai Local) फर्स्ट क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. मुंबई लोकलच्या (Mumbai Local Train) फर्स्ट क्लासच्या तिकीट दरामध्ये 50% कपात केली जाणार आहे. मध्य रेल्वेने अलिकडेच एसी लोकल तिकीट दरात थोड्या प्रमाणात कपात केली होती. त्यानंतर आता प्रवाशांना मिळालेली ही दुसरी भेट आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी मुंबई येथे याबाबत आज म्हणजे 1 मे रोजी घोषणा केली. मुंबई शहरात लोकल ट्रेनला खूप महत्त्व आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. (Mumbai Local Train Updates)
दरम्यान, रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष वी. के. तिवारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, फर्स्ट क्लासच्या मासिक पासच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. ठाणे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत प्रवास करायचा असेल तर त्याचे सध्याचे फर्स्ट क्लासचे तिकीट 140 रुपये आहे. त्यासाठी मासिक पास 755 रुपये इतका आहे. सामान्य लोकांना हा दर अधिक वाटतो. नव्या सवलीतमुळे त्यात 50% कपात करण्यात आलेली आहे. त्यामुळे तिकीट दर आता 85 रुपयांवर आला आहे.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी यांनी घोषणा करताना शुक्रवारी म्हटले, एसी लोकलमधून पाच किलोमीटरचा प्रवास 65 ऐवजी आता केवळ 30 रुपयांमध्ये करता येणार आहे. लोकांच्या सेवेसाठीच एसी लोकल सुरु करण्यात आली होती. मात्र, तिकीटाचे अधिकचे दर पाहता त्याला म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नव्हता. सामान्य लोकांनाही हे दर परवडत नव्हते. त्यामुळे एसी लोकलमध्येही दर कमी करण्याचा विचार करण्यात आल्याचे दानवे म्हणाले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.