महाराष्ट्रात बनणार 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था: राज्यपाल कोश्यारी

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि असे करणारे ते देशातील पहिले राज्य असणार आहे असे सांगितले आहे.
Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh KoshyariDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी रविवारी राज्याच्या स्थापनेला 62 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने सांगितले आहे की, महाराष्ट्र 10 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि असे करणारे ते देशातील पहिले राज्य असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद (Ram Nath Kovind) यांनीही स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Maharashtra to have 10 trillion economy Governor Bhagat Singh Koshyari)

Bhagat Singh Koshyari
महाराष्ट्रात पुन्हा कोरोनाची त्रिसुत्री होणार लागू? आरोग्यमंत्र्यांनी दिला सल्ला

मुंबईतील दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे आयोजित कार्यक्रमात कोश्यारी यांनी राष्ट्रध्वज फडकावला आणि जमलेल्या बांधवाना संबोधित केले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तिथे उपस्थित होते आणि दोघेही एकमेकांना शुभेच्छा देताना दिसून आले, मात्र, यापूर्वी राज्यपाल आणि ठाकरे विविध मुद्द्यांवरूनही एकमेकांवर टीका करत आहेत.

कोश्यारी म्हणाले की, महाराष्ट्राने कोविड-19 (Covid-19) च्या तिन्ही लाटांचा नियोजनबद्ध पद्धतीने मुकाबला करून देशासमोर आदर्श ठेवला. ते म्हणाले की, राज्यातील 92 टक्क्यांहून अधिक लोकांना लसीचा किमान एक डोस दिला गेला आहे.

ते म्हणाले की, 'आम्ही कोविड-19 साथीच्या आजारातून जात आहोत, परंतु राज्याच्या प्रगती आणि विकासात कोणताही अडथळा आलेला नाहीये. महाराष्ट्रची दहा ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणार आहे आणि असे करणारे ते देशातील पहिले राज्य असेल असंही राज्यपाल कोश्यारी यावेळी म्हणाले आहे.

Bhagat Singh Koshyari
राज ठाकरेंनी औरंगाबादचीचं का निवड केली? ''34 वर्षांपूर्वी बाळासाहेबांनीही...'

रविवारी पंतप्रधान मोदींनी ट्विट केले आहे की, 'राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. देशाच्या प्रगतीत या राज्याचे अतुलनीय योगदान ठरले आहे. महाराष्ट्रातील जनतेने विविध क्षेत्रात आपले कर्तृत्व दाखवून दिले, तर राज्यातील जनतेला समृद्धी लाभो अशी माझी इच्छा आहे. यावेळी त्यांनी मराठी भाषेत शुभेच्छाही दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com