Konkan Railway Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Konkan Railway Update: कोकणात पावसाचं धूमशान! कोकण रेल्वे मार्गावरील ‘या’ गाड्या रद्द तर काहींचे रुट बदलले; पाहा संपूर्ण यादी

Konkan Railway Update: कोकणात सध्या पावसानं हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली.

Manish Jadhav

Konkan Railway Update: कोकणात सध्या पावसानं हाहाकार माजवला आहे. या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा कोकण रेल्वे ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गावर खेडजवळ कशेडी बोगद्यासमोर दरड कोसळल्याने या मार्गावरील रेल्वे सेवा ठप्प झाली. तब्बल 15 तास उलटले तरी या मार्गावरील सेवा पूर्ववत झालेली नाहीये. प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत आहे.

दुसरीकडे, मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूकही ठप्प झाली. कोकण रेल्वेवरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या तर काही गाड्या दुसऱ्या मार्गे वळवण्यात आल्या. दरम्यान, तब्बल 13 तासांपासून प्रवासी रेल्वेत अडकून पडले आहेत. त्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, कोकणात गेल्या दोन दिवसांपासून पावसान धूमशान घातलं आहे. पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. या पावसाचा मोठा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. दिवाणखवटी नातुवाडी बोगद्याजवळ माती आणि झाडे उन्मळून ट्रॅकवर पडल्याने कोकण रेल्वे (Konkan Railway) मार्गावरील वाहतूक ठप्प झाली.

दरम्यान, कोकण रेल्वेकडून कोणत्या गाड्या रद्द केल्या आणि कोणत्या गाड्या दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आल्या जाणून घेऊया...

रद्द केलेल्या गाड्या

मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द

ट्रेन क्रमांक 12051 मुंबई सीएसएमटी-मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 10105 दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 10103 मुंबई सीएसएमटी-मडगाव मांडवी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 11003 मुंबई सीएसएमटी-मडगाव तुतारी एक्स्प्रेस

गोव्याहून मुंबईहून जाणाऱ्या एक्स्प्रेस रद्द

ट्रेन क्रमांक 50108 मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर

ट्रेन क्रमांक 50108 सावंतवाडी-दिवा एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 11004 सावंतवाडी - दादर तुतारी एक्स्प्रेस

ट्रेन क्रमांक 12134 मंगळुरू-मुंबई सीएसएमटी एक्स्प्रेस

या गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला

कोकण रेल्वे मार्गाने जाणाऱ्या पाटणा-वास्को द गामा (12742) ही गाडी कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे वळवण्यात आलीय.

तर लोकमान्य टिळक- मंगळूरु सेंट्रल एक्सप्रेस (12619) गाडी आता रोहा येथे अडकून पडल्याने ती आता कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज- मार्गे पुढे जाणार आहे.

गांधीधाम- नगरकोइल जंक्शन एक्सप्रेस (16335) कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे पुढे मडगाव - ठोकूर - मंगळुरुला सोडली जाणार आहे.

निजामुद्दीन - एर्नाकुलम एक्सप्रेस (12284) कल्याण-लोणावळा-पुणे-मिरज-लोंडा-मार्गे वळवली जाणार आहे.

लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल एक्सप्रेस (16345) ही गाडी लोणावळा - पुणे - मिरज - लोंडा - मडगाव - ठोकूर - मंगळुरू जंक्शन - एर्नाकुलम.

पुणे जं. - एर्नाकुलम जं. एक्सप्रेसचा (22150) ही गाडी आता कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली जाणार आहे.

लोकमान्य टिळक (टी) - तिरुवनंतपुरम सेंट्रल नेत्रावती एक्सप्रेस (16345) ही एक्सप्रेस ट्रेन आता कल्याण - लोणावळा - दौंड जंक्शन मार्गे वळवली जाणार आहे.

गांधीधाम - नागरकोइल एक्सप्रेस (16335) ही ट्रेन कल्याण - लोणावळा - पुणे मार्गे वळवण्यात आली आहे.

एच. निजामुद्दीन - एर्नाकुलम जं. एक्सप्रेस (12284) ही गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवण्यात आली आहे.

उधना - मंगळुरू जंक्शन (09057) ही गाडी कल्याण - लोणावळा - दौंड मार्गे वळवली आहे.

कोकण रेल्वेच्या या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल

मुंबई (Mumbai) सीएसएमटी- मंगळुरु जं. एक्स्प्रेसचा गाडी क्र. 12133 आज पुन्हा 2 वाजता शेड्यूल करण्यात आलीय. तर 11033 ही गाडी दादर सावंतवाडी रोड तुतारी एक्सप्रेस आज 3.50 वाजता शेड्यूल करण्यात आलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT