Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: कोकणी माणसाचो गणपती यंदा उत्साहात... मुंबई-गोवा महामार्गाची प्रतीक्षा संपणार, नितीन गडकरींची मोठी घोषणा

Nitin Gadkari On Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग केवळ मुंबई व गोवा यांच्यामधील दळणवळणासाठी नव्हे, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि उद्योगांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे.

Sameer Amunekar

सावंतवाडी: गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आणि कोकणवासीयांच्या स्वप्नातला मुंबई-गोवा महामार्ग कधी पूर्ण होणार? हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. अनेक वेळा आश्वासनं दिली गेली, परंतु काम मात्र पूर्ण होताना दिसत नव्हतं. मात्र, आता ही प्रतिक्षा संपण्याची शक्यता आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नुकत्याच एका कार्यक्रमात बोलताना या महामार्गासंदर्भातील मोठी घोषणा केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोकणात जाणाऱ्या लाखो भाविकांसाठी हा महामार्ग एक महत्त्वाचा दुवा ठरतो. मात्र अपूर्ण कामं, खड्डेमय रस्ते, वाहतूक कोंडी आणि अपघातांची भीती यामुळे या प्रवासात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

नितीन गडकरी म्हणाले, मुंबई- गोवा महामार्गाच्या कामात अनेक समस्या आल्या. हा मार्ग आमच्या विभागातील ब्लॅक स्पॉट होता. मात्र, आता यावर्षी जूनअखेरपर्यंत या रस्त्याचं काम पूर्ण होईल," असा स्पष्ट आणि ठाम विश्वास त्यांनी या कार्यक्रमात व्यक्त केला.

महामार्गाचे महत्त्व

मुंबई-गोवा महामार्ग केवळ मुंबई व गोवा यांच्यामधील दळणवळणासाठी नव्हे, तर कोकणातील पर्यटन, व्यापार आणि उद्योगांसाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. महामार्ग पूर्ण झाल्यानंतर मुंबईहून गोव्यापर्यंतचा प्रवास केवळ ६ ते ७ तासांत शक्य होईल. तसंच कोकणात पर्यटनाला मोठा चालना मिळेल.

कोकणवासियांना दिलासा

यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणेश चतुर्थी आहे. दरवर्षीप्रमाणे लाखो भाविक मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर शहरांतून कोकणात आपल्या गावी जातात. या काळात महामार्गावर प्रचंड वाहतूक वाढते.

जर नितीन गडकरींनी सांगितल्याप्रमाणे जूनच्या अखेरपर्यंत महामार्गाचं काम पूर्ण झालं, तर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा मिळेल. वाहतूक कोंडी, अपघात आणि अडथळ्यांपासून सुटका मिळेल आणि प्रवास अधिक सुखकारक होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: माजी पर्यटनमंत्र्यांना 13 लाखांचा गंडा, आर्थिक व्यवहारातून फसवणूक; दोघांविरोधात तक्रार नोंद

Ganesh Chaturthi: वय वर्षे 84, तरीही गणरायाची सेवा; वयाच्या 10व्या वर्षांपासून जोपासली आहे मूर्तिकलेची आवड

Goa Live News: मरड-धारबांदोडा येथील बेकायदेशीर चिरे खाणीवर छापा!

Bear Attack Quepem: चिंताजनक! अस्वलाने केला प्राणघातक हल्ला, केपेतील शेतकरी गंभीर जखमी

Goa Politics: सोमवारी होणार खातेवाटप, दामू नाईकांची स्पष्टोक्ती; अमावस्येमुळे निर्णय लांबल्याचा निर्वाळा

SCROLL FOR NEXT