Goa Crime: लैंगिक अत्याचाराच्या संशयिताला कोर्टाचा दणका! पीडितचे मेसेज अन् फोटो असल्याकारणाने मोबाईल देण्यास नकार

Panaji Sexual Assault Case Update: बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचे मेसेजीस व छायाचित्रे संशयिताच्या मोबाईलमध्ये असल्याने व त्या मोबाईलची ओळख साक्षीदारांनी पटवण्यासाठी तो न्यायालयात सादर करण्याची आवश्‍यकता आहे.
Panaji Sexual Assault Case Update
CourtDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Court Rejects Accused Plea To Retain Mobile In Sexual assault case

पणजी: बलात्कार प्रकरणातील पीडित तरुणीचे मेसेजीस व छायाचित्रे संशयिताच्या मोबाईलमध्ये असल्याने व त्या मोबाईलची ओळख साक्षीदारांनी पटवण्यासाठी तो न्यायालयात सादर करण्याची आवश्‍यकता आहे, असे निरीक्षण करत पणजीतील जलदगती विशेष न्यायालयाने (पोक्सो) संशयिताने मोबाईलसाठी केलेला अर्ज फेटाळला.

उत्तर गोवा पोलिसांनी (Goa Police) संशयिताविरुद्ध बलात्कार प्रकरणीच्या आरोपाखाली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याचा मोबाईल जप्त केला होता. त्यामध्ये पीडित तरुणी व संशयित यांच्यातील चॅट मेसेजीस तसेच छायाचित्रे आहेत. पीडित तरुणीची काही वैयक्तिक माहितीही त्यामध्ये आहे.

Panaji Sexual Assault Case Update
Goa Sexual Assault: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; 25 वर्षीय परप्रांतीय तरुणाला अटक

आरोपपत्रावरील सुनावणीवेळी साक्षीदारांच्या जबान्या अजून नोंद होणे बाकी आहे तसेच हा मोबाईल न्यायालयात साक्षीदारांना दाखवून त्याची ओळख पटविणे बाकी आहे. हा मोबाईल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आला होता त्याचा अहवाल आला आहे. जर हा मोबाईल संशयिताला दिल्यास पीडित तरुणी व संशयित यांच्यामधील संवादाच्या माहितीमध्ये हस्तक्षेप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याक्षणी त्याला मोबाईल दिला जाऊ नये, अशी बाजू सरकारी वकिलांनी पोलिसांतर्फे मांडली.

मोबाईल महत्त्वाचा पुरावा

बलात्काराचा आरोप असलेल्या संशयिताविरुद्धच्या खटल्यात मोबाईल हा महत्त्वाचा पुरावा आहे. जरी तपासणी अहवाल आला असला तरी मोबाईल संशयिताला देणे योग्य होणार नाही; कारण हा खटला आरोप निश्‍चित करण्याच्या टप्प्यावर आहे. अजून संशयिताविरुद्ध आरोप निश्‍चित झालेले नाहीत. त्यामुळे त्याला मोबाईल देण्याच्या बाजूने न्यायालय (Court) नाही, असे निरीक्षण आदेशात करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com