Mumbai Police Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai: मुंबईतील गॅगस्टर गणेश शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

आरोपीला काल न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दैनिक गोमन्तक

मुंबईतील बिल्डरला धमकावून खंडणी मागणाऱ्या गुंड गणेश शिंदेला (Ganesh Shinde) मुंबई पोलिसांच्या अँटी एक्स्टॉर्शन सेलने अटक केली. आरोपीला काल न्यायालयात हजर केले असता, त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

दरम्यान, मुंबईतील (Mumbai) एका बड्या व्यावसायिकाला धमकी दिल्या प्रकरणी गॅगस्टर गणेश शिंदेला वांद्रे पोलिसांनी अटक केली होती. काही दिवसांपूर्वी गॅगस्टर गणेश शिंदेकडून प्रसिद्ध व्यावसायिक सुधाकर शेट्टी यांना धमकी देण्यात आली होती.

शेट्टी यांनी वांद्रेच्या लिलावती रुग्णालयात उपचार घेत असताना. गणेश शिंदे याच्यासह काही जणांनी त्यांना पैशांसाठी धमकावल्याची तक्रार रविवारी 16 ऑक्टोबरला त्यांनी वांद्रे पोलिसात दिली होती. या प्रकरणी शेट्टी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार वांद्रे पोलिसात गणेश शिंदे व इतर आरोपींविरोधात भा.द.वि 385 ,452 ,506(2), 34 कलमांतर्गग गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी वांद्रे पोलिस अधिक तपास करत होती. पोलिसांनी आरोपी गणेश शिंदेचा माग काढत सोमवारी 17 ऑक्टोबर रोजी त्याला जेरबंद केला. या प्रकरणात पुढील तपास करण्यासाठी हा गुन्हा आता मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी कक्षाकडे वर्ग करण्यात आला आहे.

youtube.com/watch?v=Ouduoct9ACM

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT