Diwali Special: ऐन दिवाळीत प्रवाशांना मोठा फटका, रेल्वेचं तिकीट महागलं

Platform Ticket Increased: सणासुदिच्या काळात रेल्वे स्थानकावर गर्दी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते.
Diwali Special
Diwali SpecialDainik Gomantak
Published on
Updated on

कोरोना विषाणुचे (Corona) निर्बध कमी झाल्यामुळे दोन वर्षानंतर देशभरात मोठ्या उत्सवात दिवाळी साजरी केली जात आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी दिसत आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकावरील गर्दीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तसेच मुंबईत रेल्वेने येणाऱ्या अथवा मुंबईतून रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांचीही संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळेच मुंबईतील (Mumbai) महत्वाच्या रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी पाहून मध्य रेल्वेने प्लॅटफॉर्म तिकिटाच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे.

ही वाढ मोजक्याच स्थानकात आणि तात्पुरत्या स्वरुपाची असेल, अशी माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे. 31 ऑक्टोबरपर्यंत महत्वाच्या रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आली आहे, असेही मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

दिवाळीमुळे (Diwali) रेल्वे स्थानकावर गर्दी वाढली आहे. त्यामुळे प्लॅटफॅार्म तिकिटांच्या किंमतीमध्ये तात्पुरत्या स्वरुपात वाढ करण्यात आली आहे. सीएसएमटी (CSMT), दादर (Dadar), ठाणे (Thane), कल्याण (Kalyan), लोकमान्य टीळक टर्मिनस (LTT) आणि पनवेल रेल्वे स्थानकावर (Panvel Railway stations) प्लॅटफॅार्म तिकिटाची किंमत 50 रुपये करण्यात आले आहे. अशी माहिती मध्य रेल्वेनं ट्वीट करत दिली आहे.

Diwali Special
Maharashtra आरोग्य खात्यात मेगा भरती, दहा हजारांहून अधिक जागा भरणार

दरम्यान, महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) तीन नव्या कोरोना व्हेरियंटची एन्ट्री झाली आहे. दिवाळीमुळे सर्वच ठिकाणी गर्दी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहान केले आहे.

youtube.com/watch?v=Ouduoct9ACM

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com