Mumbai Crime Dainik Gomantak
महाराष्ट्र

गृहमंत्रालयाचा खोटा रुबाब अन् लाखोंचा गंडा, अमित शाहांचा पीए बोलतोय सांगून पोलिसांनाच लुटलं; अखेर भामट्याला ठोकल्या बेड्या!

Mumbai Crime Branch Arrest: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खासगी सचिव असल्याचे भासवून पोलीस अधिकारी आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या.

Manish Jadhav

Mumbai Crime News: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा खासगी सचिव (Personal Secretary) असल्याचे भासवून पोलीस अधिकारी आणि सर्वसामान्यांची फसवणूक करणाऱ्या एका सराईत भामट्याला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. मोहम्मद तारिक पठाण (वय 41) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील रहिवासी आहे. नवी मुंबईतील वाशी येथील एपीएमसी मार्केट परिसरातील एका हॉटेलमधून पोलिसांनी त्याला अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मोहम्मद पठाण स्वतःची ओळख केंद्रीय गृहमंत्र्यांचे खासगी सचिव 'पवन कुमार यादव' अशी करुन देत असे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करुन विविध प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याचा तो प्रयत्न करत असे. कधी नवीन एफआयआर दाखल करण्यासाठी, तर कधी अटक केलेल्या आरोपींना दिलासा देण्यासाठी तो गृहमंत्रालयाचा दबाव वापरत असे. या मदतीच्या बदल्यात तो लोकांकडून मोठी रक्कम उकळत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. आपले कृत्य खरे वाटावे यासाठी तो दरवेळी नवीन सिमकार्ड खरेदी करायचा आणि दुसऱ्या फोनमध्ये आपला नंबर 'PS to MHA' या नावाने सेव्ह करुन वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉल करत असे.

या प्रकरणाचा खुलासा 1 मार्च रोजी घडलेल्या एका घटनेमुळे झाला. दिल्लीतील कनॉट प्लेस पोलीस ठाण्याचे एक पथक एका महिलेला वारंट बजावण्यासाठी मुंबईतील ग्रँड रोड परिसरात आले होते. संबंधित महिला आरोपीला (Accused) आधीच सांगण्यात आले होते की, तिला एका प्रभावशाली व्यक्तीचा फोन येईल. त्यानंतर पठाणने स्वतःला गृहमंत्र्यांचा साहाय्यक असल्याचे सांगून दिल्ली पोलिसांना फोन केला आणि त्या महिलेला त्रास न देण्याची तंबी दिली. मात्र, त्याच्या संशयास्पद वागण्यामुळे आणि बोलण्याच्या पद्धतीमुळे पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तातडीने गुन्हे शाखेला याची कल्पना दिली.

गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पठाण आपला ठावठिकाणा लपवण्यासाठी सतत मोबाईल फोन आणि सिमकार्ड बदलत असे. त्याने विविध राज्यांमधून इतर व्यक्तींच्या नावावर सिमकार्ड खरेदी केल्याचेही समोर आले. त्याने आतापर्यंत किती लोकांची फसवणूक (Fraud) केली आणि किती रक्कम उकळली, याचा शोध पोलीस सध्या घेत आहेत. आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान (IT) कायद्याच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचे आणखी काही साथीदार आहेत का, याचा तपास सुरु आहे. अशा प्रकारे कुणीही मंत्रालयाचे नाव सांगून संपर्क साधल्यास नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

SCROLL FOR NEXT