Mumbai Building Collapse AnI
महाराष्ट्र

Mumbai Building Collapse: कुर्ला परिसरातील चार मजली इमारत कोसळली; 20-25 जण ढिगाऱ्याखाली अडकले

Mumbai: घटनास्थळी सध्या 20 ते 25 जण अडकल्याची भीती असुन मदत आणि बचाव कार्य सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात मुंबईत चार मजली इमारत कोसळली. इमारत कोसळल्यानंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही वेळातच इमारतीभोवती मोठा जमाव जमला. स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू केले. (Mumbai Building Collapse News)

बीएमसीच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 7 लोकांना बाहेर काढण्यात आले असुन एकाचा मृत्यू झाला आहे. इमारतीच्या (Building) ढिगाऱ्याखाली अजूनही 20 ते 25 लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. बीएमसीने इमारत रिकामी करण्याच्या सूचना देऊनही सुमारे 10 कुटुंबांनी इमारत रिकामी केली नाही.

*आदित्य ठाकरे घटनास्थळी पोहोचले

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सांगितले की, ढिगाऱ्याखालून 5 ते 7 जणांना बाहेर काढण्यात आले आहे. या लोकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, तरीही हे लोक त्यात राहत असल्याचे त्यांनी सांगितले. सर्वांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Surya Gochar 2026: 11 जानेवारीपर्यंत सूर्य देवाची विशेष कृपा! 'या' 3 राशींच्या नशिबात राजयोग; सोन्यासारखे चमकतील दिवस!

Konkan Tourism: गर्दीपासून दूर, निसर्गाच्या कुशीत! नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी कोकणातील 'ही' 5 शांत ठिकाणं आहेत बेस्ट

घराजवळ चर्च आहे का? गोव्यात घर घेतल्यानंतर अर्शद वारसीच्या सासू-सासऱ्यांनी त्याला पहिला प्रश्न काय विचारला? VIDEO

गोवा जिल्हा पंचायत अध्यक्षपदासाठी अर्ज सादर; उत्तरेत भाजपच्या रेश्मा बांदोडकर, दक्षिणेत सिद्धार्थ गावस तर काँग्रेसतर्फे लुईझा रॉड्रिग्ज रिंगणात

Accident News: गोव्याची सहल ठरली अखेरची; सोलापूरजवळ भीषण अपघात, दोन जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT