Shivshahi ST Bus  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोरोनाच्या संकटात ST महामंडळाचा प्रवाशांच्या जीवाशी खेळ

कोरोनाचं हे संकट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला नाके नऊ आले. मात्र आता दुसरीकडे MSRTC यातुन कोणताच धडा घेतलेला दिसत नाहीये.

दैनिक गोमन्तक

देशात कोरोना महामारीच (Covid 19 Pandemic) संकट सुरू असताना मास्क आणि सॅनिटायझरबद्दल जनजागृती (Awareness) करण्यासाठी शासन एकीकडे लाखो रुपये खर्च करत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राची लाईफ लाईन समजली जाणारी माहाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची (ST Bus) बस मात्र प्रवाशांना कचऱ्यात बसुन प्रवास करण्यास भाग पाडताना दिसतेय. पुण्याहुन नागपुरडे जाणारी शिवशाही बस अतिशय घाणेरड्या अवस्थेत प्रवाशांना घेऊन जात असल्याने प्रवाशांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. (MSRTC neglects cleanliness in Corona crisis)

पुण्याहून नागपुरकडे जाणाऱ्या बसमध्ये मोठी घाण असल्याचे प्रवाशांनी पाहीले आणि त्यानंतर प्रवाशांनी ही बस डेपो मध्ये घेऊन स्वच्छ करण्याची विनंती केली. त्यानंतर ही बस स्वच्छ तर झाली मात्र कर्मचाऱ्यांकडुन असे सांगण्यात आले की, बस डेपोमधुनच अशी पाठवले जाते.

कोरोना रुग्णांच्या संख्येत महाराष्ट्राचा क्रमांक अव्वल होता. कोरोनाचं हे संकट नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला नाके नऊ आले. मात्र आता दुसरीकडे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने यातुन कोणताच धडा घेतलेला दिसत नाहीये. महामंडळाच्या या कारभाराचा प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे पहायल मिळते आहे. प्रवाशांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ कधी थांबणार हा प्रश्न आता निर्माण होतोय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway वर भीषण अपघात! भरधाव कारनं दोन अल्पवयीन मुलींना उडवलं, दोघींचीही प्रकृती गंभीर Watch Video

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

SCROLL FOR NEXT