Mumbai High Court Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai HC: वंश टीकवण्यासाठी धडपड, मुलाच्या वीर्यासाठी आईची उच्च न्यायालयात धाव

Mumbai High Court: न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देताना क्लिनिकला पुढील निकालापर्यंत वीर्य संरक्षित करण्याचे आदेश दिलेत.

Pramod Yadav

मुंबई: मृत अविवाहित मुलाचे वीर्य मिळविण्यासाठी आईने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. कर्करोगाने मृत पावलेल्या मुलाचे वीर्य क्लिनिकमध्ये साठवून ठेवण्यात आले आहे.

मुलाच्या मृत्यूनंतर क्लिनिकने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर मुलाच्या आईने मुंबईस्थित उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. वंश वाढवण्यासाठी मुलाचे वीर्य प्रजनन केंद्राला देण्याचे आदेश क्लिनिकला देण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे.

याचिकाकर्ता महिलेचा मुलगा कर्करोगाशी झुंज देत होता, यावेळी त्याने क्लिनिकला त्याचे वीर्य जतन करण्याचा पर्याय निवडला होता.

मृत्यूनंतर मात्र वीर्य नष्ट करण्याची विनंती त्याने केली होती. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने मुलाच्या वीर्य देण्याची मागणी केल्यानंतर देण्यास क्लिनिकने नकार दिला. यानंतर मुलाच्या आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायालयाने या याचिकेवर सुनावणी देताना क्लिनिकला पुढील निकालापर्यंत वीर्य संरक्षित करण्याचे आदेश दिलेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० जुलै रोजी ठेवण्यात आली आहे.

मुलाचा वंश वाढविण्यासाठी त्याचे संरक्षित करण्यात आलेले वीर्य प्रजनन केंद्राला पाठविण्याची विनंती आईने याचिकेद्वारे केली आहे. क्लिनिकने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर आईने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

कर्करोगाशी झुंज देणाऱ्या मुलावर केमोथेरपी करण्यात आली यावेळी त्याने वीर्य संरक्षित करण्याचा पर्याय निवडला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT