Monsoon Update: Rains to hit Konkan on Monday Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: कोकणात उद्या पावसाची शक्यता, मात्र उर्वरीत भागात विश्रांती

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरावर असून, ते मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे(Monsoon Update)

Abhijeet Pote

मागील अनेक दिवसांपासून राज्यात बरसणाऱ्या वरून राजाने अनेक भागात आता विश्रांती घेतलेली पाहायला मिळत आहे(Maharashtra Rain). मात्र उद्या, 2 ऑगस्ट रोजी कोकणात सर्वत्र मध्यम पावसाची शक्यता वर्तवली जात आहे(Monsoon Update). तसेच राज्यात उर्वरीत काही ठिकाणी हलक्या सरींसह, पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.(Monsoon Update: Rains to hit Konkan on Monday)

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता उत्तर प्रदेश आणि आजूबाजूच्या परिसरावर असून, ते मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे सरकण्याची शक्यता आहे.त्याचबरोबर हरियाणा आणि परिसरावरही हवेचे कमी दाबाचे क्षेत्र काही प्रमाणात सक्रियअसल्याचे पाहायला मिळत आहे . मॉन्सूनची शक्यता असलेल्या कमी दाबाचा पट्टा अनुपगडपासून कमी दाब क्षेत्रांमधून उत्तर बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे.

या निर्माण झालेल्या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे उत्तर भारतात मॉन्सून सक्रीय राहणार असून दक्षिण भारतात मात्र पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज आहे. उद्या महाराष्ट्रातील कोकणात सर्वत्रच हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज वर्तवला जात आहे. पावसाला पोषक हवामान नसल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरींसह पावसाची विश्रांती राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Comunidade: 30 कोमुनिदादींची निवडणूक घ्या! सदस्यांची मागणी; गणपूर्तीअभावी रखडल्या प्रक्रिया

Marcel: माशेल बाजारात पोदेरांमुळे वाहतूक कोंडी! बेशिस्त प्रकार; पंचायतीच्या सूचनांकडे दुर्लक्ष

Arambol Bamanbhati: बामणभाटीत शेतजमीन पाण्याखाली! प्रशासनाचे दुर्लक्ष; उपाययोजना न आखल्याने शेतकरी नाराज

Cab Driver Mental Test: कॅबचालकांची ‘मेंटल टेस्‍ट’ हवीच, केंद्राच्‍या प्रस्‍तावाचे गोव्यात स्‍वागत; अपघात, दुष्‍कृत्‍ये टळणार

SCROLL FOR NEXT