Lalbaugcha Raja: यंदाच्या वर्षी विराजमान होणार

राज्यावर कोरोनाचं (Covid 19) सावट असताना दुसरीकडे लालाबागच्या राज्याच्या (Lalbaugcha Raja) भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे.
Lalbaugcha Raja
Lalbaugcha RajaDainik Gomantak
Published on
Updated on

राज्यावर कोरोनाचं (Covid 19) सावट असताना दुसरीकडे लालाबागच्या राज्याच्या (Lalbaugcha Raja) भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या वर्षी लालबाग राजा विराजमान होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील वर्षा कोरोनाच्या संसर्गामुळे लालबाग राजाच्या गणेशोत्सव मंडळाने आरोग्य उत्सव साजरा केला होता. यंदा मात्र राज्य सरकारच्या (State Government) गाइडलाईन्स नुसार सर्व सूचनांचे पालन करुन गणेश उत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मूर्तीच्या उंचीसाठी राज्य सरकारकडून घालून दिलेल्या नियमांचे देखील पालन करण्यात येणार असल्याचेही मंडळाकडून सांगण्यात येत आहे.

Lalbaugcha Raja
CM ठाकरेंचा इशारा; म्हणाले, एकच 'थप्पड' दिली तर पुन्हा उठणार नाहीत

लालबाग राजाच्या गणेशोत्सव मंडळाचे सचिव सुधीर साळवी(Sudhir Salvi) यांनी म्हटले, लालबागच्या राजाची लाखो भाविक वाट पाहत होते. त्यांच्यासाठी ही आनंदाची पर्वणी असणार आहे. मंडळाच्या काल झालेल्या बैठकिमध्ये यंदाच्या वर्षी लालबागचा राजा विराजमान होणार आहे. त्याचबरोबर गणेशभक्तांना ऑनलाईन दर्शन, ऑनलाईन प्रसादाची सुविधाही उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना या कोरोना काळातही दर्शन घेण्यासाठी गर्दी करावी लागणार नाही.

Lalbaugcha Raja
बळीराजाला आता घर बसल्या आपल्या पिकांचे करता येणार रजिस्ट्रेशन

साळवे पुढे म्हणाले, यंदाच्या वर्षी लालबागच्या राजा विराजमान होणार असला तरी राज्य शासनाने जे कोरोना नियम घालून दिले दिले आहेत त्यांचे काटकोरपणे पालन करण्यात येणार आहे. शिवाय पुढे सुध्दा राज्य शासनाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे. गणेश मूर्तीच्या उंची किती असावी याबद्दलची कोणतीही मर्यादा घालण्यात आलेली नाही. गणेशाच्या मूर्तीसंबंधी कोणत्याही प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे चार फुटाच्या मूर्तीची उंचीची मर्यादा असल्यामुळे चार फुटांचा लालबाग राजाची यंदाच्या वर्षी प्रतिष्ठापना होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com