बंगालच्या उपसागरात (Bay Of Bengal) सक्रीय झालेल्या प्रणालीमुळे काहीकाळ विश्रांती घेतलेल्या पावसाने राज्यात (Maharashtra Rain) पुन्हा जहरी लावली आहे. आणि याचाच परिणाम म्हणून पावसाळा सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस नोंदवला गेला आहे (Heavy Rain). राज्यात एकूण पाऊस आत्तापर्यंतच्या अपेक्षित सरासरीच्या 14 टक्के अधिक आहे (Rain In Maharashtra). आणि सध्याहि राज्यातील अनेक भागात पावसाच्या सारी कोसळतच आहेत अशातचआता पुढील पाच दिवसांमध्ये पुन्हा एकदा राज्यात विविध ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (Monsoon Update: Heavy or normal rain in Maharashtra within next 5 days)
राज्यातील आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या सरासरीचा विचार करता राज्यात मध्य महाराष्ट्रात आत्तापर्यंत सरासरीहून 12 टक्के अधिक पाऊस पडला आहे (Monsoon Update) तर मराठवाड्याचा विचार करता या भागात 32 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे . विदर्भात मात्र पाऊस सरासरीच्या श्रेणीतच असून उलट या भागात 1 टक्के कमी पावसाची नोंद करण्यात अली आहे. मात्र आत्तापर्यंत विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात सध्या पडत असलेल्या पावसाने ही कमी भरून काढली आहे. आणि आताच्या पावसाची नोंद पाहता राज्यातील सर्वच जिल्हे सरासरीच्या श्रेणीमध्ये आले आहेत.
पुढील काही दिवसांमध्येही राज्यात पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. यात रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे तर दसुरीकडे सिंधुदुर्गात रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडू शकेल असे सांगितले जात आहे . पालघर, ठाणे, मुंबई येथेही सोमवारी पावसाचा जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवला जात आहे . तर धुळे, नंदूरबार, जळगाव या जिल्ह्यांचा विचार करता शनिवारी या जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढू शकतो.
नाशिक, पुणे आणि सातारा या जिल्ह्यात जे घाट परिसर आहेत त्या ठिकाणीही येते काही दिवस पाऊस थोड्या प्रमाणात असणारच आहे. त्याचबरोबर या साऱ्या भागांत मुसळधार पावसाची शक्यताहि वर्तवली जात आहे. तर मराठवाड्याचा विचार करता परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर येथे तुरळक ठिकाणी सोमवारपर्यंत मुसळधार पाऊस पडू शकतो.असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.