Monsoon Update: मागील आठवड्यात कोकण (Konkan) घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र (North Maharashtra) आणि विदर्भात (Vidarbha) चांगला पाऊस (Rain) झाला आहे. यामुळे येथील धरणांच्या पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात अनेक भागात सध्या पाऊस कमी झाला असून, 17 ते 23 सप्टेंबर (September) या दरम्यान कोकण, उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल. तर विदर्भ, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सरासरी पेक्षा कमी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
सप्टेंबरच्या सुरुवातीला राज्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने खरिपाच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर बहुतांश ठिकाणी या शेतकऱ्याला दिलासा देखील मिळाला आहे. बंगालच्या उपसागरात कमी तीव्रतेचे वादळ असून, गुजरात आणि त्याच्या आसपासच्या भागात असलेले कमी दाबाचे क्षेत्र, मॉन्सून आता दक्षिणेकडे सरकलेला आहे.
9 ते 15 सप्टेंबर या आठवड्यात झालेल्या सरासरी पावसाचा विचार करता कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ येथे पावसाचे प्रमाण जास्त होते. कोल्हापूर जिल्ह्यात या आठवड्यात सरासरीच्या तुलनेत 354 टक्के पाऊस झाला. पालघरमध्ये 306 टक्के, नंदूरबार 296, ठाणे 277, गोंदियात 255 टक्के पावसाची नोंद झाली आहे. नाशिक, सातारा, धुळे, वर्धा, नागपूर, गडचिरोली येथे या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 200 टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, पुणे, जळगाव, अमरावती, अकोले, बुलडाणा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा येथे मागील आठवड्याभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर मराठवाड्यात लातूरमध्ये सर्वात कमी म्हणजे उणे 89 टक्के पावसाची नोंद झाली आहे. तसेच बीड उणे 81 टक्के, जलना उणे 77 टक्के, औरंगाबाद उणे 32 टक्के, नांदेड उणे 20 टक्के, सांगली उणे 46 टक्के, नगर उणे 35 टक्के पाऊस झाला.
17 ते 23 सप्टेंबरमध्ये कोकण, घाटमाथा, उत्तर महाराष्ट्र येथे सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रात, तसेच मराठवाड्यात आणि विदर्भाच्या बहुतांश जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज आहे. तसेच 24 ते 30 सप्टेंबर या काळात राज्यात चांगल्या पावसाची शक्यता आहे. राज्यात सर्वदूर सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.