Monsoon News Dainik Gomantak
महाराष्ट्र

6 जूनला मान्सून महाराष्ट्रात धडकणार!

महाराष्ट्रात 6 ते 10 जून या काळात सरींची पहिली बरसात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

दैनिक गोमन्तक

मान्सूनने रविवारी केरळमध्ये धडक दिल्यानंतर मान्सूनच्या (Monsoon) पुढील प्रवासाचे अनुकूल वातावरण निर्माण होत असून, मराठी मुलखावर 6 ते 10 जून या काळात सरींची पहिली बरसात होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवला आहे. सध्या मान्सून अरबी समुद्रातील मध्य भाग, केरळ, तामिळनाडू आणि कर्णाटकाच्या काही भागात दाखल झाला आहे. (Monsoon to hit Maharashtra on June 6)

दक्षिण आणि बंगालच्या उपसागरातून मान्सून पुढे वेगाने प्रवास करत आहे. येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून केरळमध्ये उर्वरीत भाग, दक्षिण अरबी समुद्र, तामिळणाडू, कर्णाटकचा आणखी काही भाग, तसेच ईशान्यकडील राज्य वेगाने पिंजून काढत आहे. यामध्ये मान्यूनमध्ये अडथळा न येता पुढे सरकण्याचा वेग कायम राहिल्यास मान्सून महाराष्ट्रात 6 जून रोजीच हजेरी लावण्याची शक्याता आहे.

गोव्यात तुरळक सरी

गेल्या 24 तासात कोकण व गोव्यात तुरळक ठिकाणी पूर्वमोसमी पाऊस पडला आहे, तर मध्य महाराष्ट्रात, विदर्भ आणि मराठवाड्यात हवामान कोरडेच आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसात कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी सरी पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजांचा कडकडाट ही होणार

पुढील 24 तासांत मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सतेच तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता देखील वर्तवली गेली आहे. त्यानंतर 2 व 3 जून रोजी कोकण आणि गोव्यात काही ठिकाणी सरी बरसण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

UP Pension Hike: 1.21 कोटी पेन्शनधारकांसाठी खूशखबर! पेन्शनमध्ये होणार घसघशीत वाढ; 'या' राज्य सरकारचं मोठं गिफ्ट

Budh Gochar 2026: करिअर आणि संपत्तीत मोठी झेप! बुध गोचरचा महाचमत्कार; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस

Shreyas Iyer Record: धावांचा पाऊस आणि विक्रमी विजय! श्रेयस अय्यरने मोडला धोनीचा रेकॉर्ड; बनला नंबर-1 टी-20 कर्णधार

Telangana ATM Robbery VIDEO: मध्यरात्री 'नाईटी'वाल्या चोरांचा धुमाकूळ! वेल्डिंगने चक्क ATM मशीन फोडली, लाखोंची कॅश घेऊन रातोरात पसार; व्हिडिओ व्हायरल

Virat Kohli Test Retirement News: अजित आगरकरांमुळे विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून घेतली निवृत्ती? वसीम जाफर यांच्या विधानाने क्रिकेटविश्वात चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT