राज्यात पावसाला (Rain) सुरुवात झाली असून, बंगालच्या उपसागरात In the Bay of Bengal) कमी दाबाचे क्षेत्र (Low pressure area) तयार झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार तर नाशिक (Nashik), ठाणे (Thane), मुंबई (Mumbai), रायगडमध्ये (Raigad) मुसळधार पाऊस होणार असून या भागात हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र आता ॲक्टिव्ह झाले असून, ते दक्षिण छत्तीसगड आणि परिसरावर सक्रीय झाले आहे. मॉन्सूनचा कमी दाबाचा पट्टा सर्वसाधारण स्थितीत दक्षिणेकडे आला आहे. तर कर्नाटक पासून केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे.
आज कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणात, रायगड परिसरात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, जळगाव, पुणे, नंदुरबार आदी जिल्ह्यात तुरळक भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, जालना, हिंगोली, नांदेड येथे जोरदार पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तविण्यात आली आहे.
गोव्यात पावसाचा जोर वाढला
पणजी: गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत राज्यात पावसाचा जोर वाढला असून सोमवारी (ता.३०) २१.५ मि.मी. पावसाची नोंद झाली. पर्जन्यप्रवण भागात आज चांगला पाऊस झाला. गुरुवारपर्यंत (ता.२) राज्यात पावसासंबंधी कोणताही इशारा नसल्याचे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. आतापर्यंत राज्यात १०१.८ इंच पावसाची नोंद झाली आहे. सोमवारी म्हापशात सर्वाधिक ८७.० मि.मी.पावसाची नोंद झाली.
फोंडा येथे ३०.०, जुने गोवा २३.८, पणजी १.२, साखळी ६१.८, काणकोण २९.० आणि सांगेत १४.० मि.मी. पावसाची नोंद झाली. राज्यात पावसाचा जोर कायम राहील, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.