Goa Monsoon Updates: ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा इशारा

मच्छिमारांनी 70 कि.मी.पर्यंत आत समुद्रात जाऊ नये. कारण अचानक वादळी वाऱ्याची शक्यता आहे.
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात (Goa) पावसाचा जोर बऱ्यापैकी ओसरला आहे. आज शुक्रवारपासून राज्यात कोणताही अलर्ट जारी करण्यात आलेला नाही. गुरुवारी राज्यात ‘यलो अलर्ट’ (Yellow alert) जारी करण्यात आला होता. मात्र, अंदाजानुसार पाऊस (Rain) झाला नाही. सोमवारपर्यंत राज्यात पावसाची अशीच स्थिती असेल, असे हवामान वेधशाळेने म्हटले आहे. मच्छिमारांनी 70 कि.मी.पर्यंत आत समुद्रात जाऊ नये. कारण अचानक वादळी वाऱ्याची शक्यता आहे, असे वेधशाळेचे प्रभारी संचालक एम. राहुल यांनी म्हटले आहे. (Goa Monsoon Updates: Warning of heavy rains in August September)

Goa Monsoon Update
गोमंतकीयांच्या ताटांत मासळी नाहीच!

राज्यात जुने गोवे, फोंडा आणि सांगे वगळता इतर भागात अत्यंत तुरळक सरी बरसल्या. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत राज्यात अतिवृष्टीची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली आहे. मागील वर्षी राज्यात गेल्यावर्षी सरासरीपेक्षा 41 टक्के अधिक पाऊस झाला होता. गेल्यावर्षी राज्यात विक्रमी 165.5 इंच पावसाची नोंद झाली होती. यंदाच्या हंगामात मॉन्सूनला सुरवात झाल्यानंतर तब्बल 91.6 इंच पावसाची नोंद झाली असून या हंगामातही पाऊस सरासरीपेक्षा अधिक होईल, असा अंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

home minister amit shah reviews goa st reservation file
mormugao port goa coal import cargo handling capacity
diksha parwadkar accident
dabolim selected model solar village goa pm surya ghar yojana chicalim panchayat geda grant rajeev samant
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com