पुणे: राज्यात (Maharashtra) पावसाचा जोर ओसरला असून, अनेक भागात अद्याप पावसाचे प्रमाण खूप कमी आहे. त्याता आता पावसाच्या उघडीपीमुळे (Rain exposure) काही भागात चिंता वाढली आहे. येणाऱ्या आठवडाभर पावसाचे प्रमाण कमीच राहणार (Rainfall will be low throughout the week) असून, ऑगस्टच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.
जुलैमध्ये कोकणातील घाटभाथा, रायगड, रत्नागिरीसह, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात जोरदार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. परंतु ती आता ओसरली आहे. हा भाग वगळता महाराष्ट्रातील इतर भागात पावसाचे प्रमाण त्या मनाने कमीच आहे.
महाराष्ट्र, गुजरातची पश्चिम किनारपट्टी आणि दक्षिण भारतात 29 जुलै ते 4 ऑगस्टमध्ये पावसाचे प्रमाण अल्पच आहे. पण उत्तरेत पावसाने चांगली हजेरी लावली आहे. राज्यातील चार विभागात पावसाने ब्रेक घेतला असून, मराठवाड्यात यंदा पुन्हा पावसाने ओढ दिली आहे.
राज्यात 6 ते 12 ऑगस्टपर्यंत पावसाची विश्रांती
पुढील दोन आठवड्यांत म्हणजेच 6 ते 19 ऑगस्ट या कालावधीत हवामान विभागाकडून अंदाज वर्तविण्यात आला आहे. यातील पहिल्या आठवड्यात म्हणजेच 6 ते 12 ऑगस्टमध्ये राज्यात पावसाने घेतलेला ब्रेक कायम राहिल. हवामान अनुकुल नसल्याने राज्यात कमी पावसाची शक्यता आहे. कोकण घाटमाथा आणि पश्चिम विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
13 ते 19 ऑगस्टला बहुतांश भागात पावसाला होणार सुरुवात
तर 13 ते 19 ऑगस्ट या आठवड्यात राज्यातील अनेक भागात पावसाला पुन्हा सुरुवात होण्याची शक्यता आहे. परंतु यात उत्तर महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमीच असेल. राज्यातील उर्वरित भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे. या आठवड्यात देखील कोकणात जोरदार पाऊस पडेल. दक्षिण मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पूर्व मराठवाडा येथे चांगल्या पावसाची शक्यता आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.