बंगालच्या उपसागरातील (Bay of bengal) सर्व कमी दाबाचे क्षेत्र झारखंड आणि बिहार राज्यांवर आहेत. मध्य उत्तर प्रदेशात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र हरियाणा आणि परिसरावर आहे आणि उद्या पर्यंत ते (मंगळवारी) नाहीसे होईल. नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार होते. मान्सूनचा (Monsoon) कमी दाबाचा पट्टा राजस्थानमधील गंगानगर ते बंगालच्या उपसागरापर्यंत या दोन्ही कमी दाबाच्या क्षेत्रांमध्ये पसरलेला आहे.
उत्तर भारतातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, उद्या महाराष्ट्रात कोकण आणि विदर्भातील सर्व भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील मराठवाड्यात हलक्या सरींसह पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
राज्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार सरींसह मुसळधार पाऊस झाला आहे. शनिवारी (ता. 31) सकाळपर्यंतच्या 24 तासांत विदर्भात अनेक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस कोसळला. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील भंडानी येथे सर्वाधिक 84 मिमी पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला, तर मराठवाड्यासह उर्वरित राज्यात पावसाने हजेरी लावली.
कोकण :
रायगड : सुधागड पाली 56, पोलादपूर 31.
रत्नागिरी : संगमेश्वर 32.
सिंधुदुर्ग : कुडाळ 35, कणकवली 30.
विदर्भ :
भंडारा : भंडारा 31, पवनी 30, साकोली 60, लाखणी 84, मोहाडी 36.
चंद्रपूर : सिंदेवाही 32, ब्रह्मपुरी 32.
गडचिरोली : गडचिरोली 39, कोर्ची 31, अरमोरी 33, धानोरा 30, कुरखेडा 31.
गोंदिया : गोरेगाव 37, सडकअर्जुनी 37, तिरोडा 31, अर्जुनी मोरगाव 38, देवरी 40.
मध्य महाराष्ट्र :
कोल्हापूर : शाहूवाडी 53, राधानगरी 30.
पुणे : वेल्हे 39.
सातारा : पाटण 32, महाबळेश्वर 59.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.