Weather  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: महाराष्ट्रातील 'या' तालुक्यांत अजुनही पाऊस नाही

महाराष्ट्रातील (Maharashtra) कित्येक तालुक्यांत सरासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

दैनिक गोमन्तक

कोकणासह (Konkan) मराठवाड्यात (Maharashtra) यंदा पावसाने चांगली हजेरी लावली असली तरी, सह्याद्रीच्या (Sahyadri) पुर्वेकडील उतारावरील धरणांच्या क्षेत्रात मात्र पावसाने दडी मारली आहे. यावर्षी पावसाळ्यात महाराष्ट्रातील 13 तालुक्यांत पाऊस कमी झाला आहे. त्यामुळे ही सगळी परिस्थिती पाहता अनेक ठिकाणी पावसाळा सुरुवातच झाली नसल्याचे पहायला मिळते आहे. मध्य महाराष्ट्राच्या बहुतांश तालुक्यांत यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झालेले दिसते आहे.

राज्यात यंदा मान्सुनने लवकर हजेरी लावत काही दिवसांतच राज्य व्यापुन घेतले. तसेच यंदाच्या हंगामात पाऊस चांगला असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होत, त्यांमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या असल्याचे पहायला मिळाले. मात्र जुनच्या शेवटच्या दोन आठवड्यांत योग्य पाऊस न झाल्याने शेतीचे नुकसान होणार असल्याचे दिसते आहे.

राज्यात 1 जुनपासुन सुरु झालेल्या पावसाचा विचार करता, नंदुरबारमधील 6 तालुके, नाशिक मधील 5 तालुके, तसेच धुळ्यातील आणि कोल्हापुरातील प्रत्येकी एक एक तालुक्यात सररासरी 50 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला असल्याचे दिसते आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goan Architecture: ‘नीज-गोंयकारांनो’ जागे व्हा! लादलेल्या प्रोजेक्ट्समुळे पारंपरिक स्थापत्यकलेचा ‘सत्यानाश’ होतोय

Shivaji Maharaj: अफझल खान मारला गेला, त्याचा मुलगा फाजल कराडच्या मशिदीच्या मिनारांमध्ये लपला; प्रतापगडची लढाई

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT