konkan special train Dainik Gomantak
महाराष्ट्र

Modi Express: "गणपतीक गावाक जावचा हा ना!" नितेश राणेंची कोकणवासियांना भेट; मोदी एक्सस्प्रेसची घोषणा

Nitesh Rane Modi Express: गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा एक खास भेट मिळणार आहे.

Akshata Chhatre

सारांश

  • गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यंदा 'मोदी एक्सप्रेस' अंतर्गत दोन 'गणपती स्पेशल' गाड्या सोडल्या जाणार आहेत.

  • या गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्वांना मोफत जेवणाची सोय असेल.

  • दोन्ही गाड्या २३ आणि २४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता दादर स्टेशनवरून सुटतील.

मुंबई: गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी यंदा एक खास भेट मिळणार आहे. मंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून गेल्या १३ वर्षांपासून सुरू असलेल्या 'मोदी एक्सप्रेस' या विशेष उपक्रमांतर्गत यंदा एक नव्हे, तर दोन रेल्वे गाड्या सोडण्यात येणार आहेत. या 'गणपती स्पेशल' गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी मोफत जेवणाची सोय देखील करण्यात येईल, अशी घोषणा मंत्री नितेश राणे यांनी केली आहे.

२३ आणि २४ ऑगस्ट रोजी दोन गाड्या

यंदा कोकणवासियांनी महायुतीला भरभरून मतदान केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, नितेश राणे यांनी या 'डबल धमाका' सेवेची माहिती दिली. या गाड्या २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सुटतील.

  • दुसरी गाडी (२४ ऑगस्ट): ही गाडी वैभववाडी आणि कणकवली येथे थांबणार आहे.

या विशेष गाड्यांमुळे गणेशोत्सवादरम्यान तिकिटासाठी होणारी धावपळ कमी होईल आणि कोकणवासियांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा आहे.

तिकिटांसाठी १८ ऑगस्टपासून नावनोंदणी

या दोन्ही गाड्यांचे तिकीट वाटप सोमवार, १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होईल. ज्या प्रवाशांना या सेवेचा लाभ घ्यायचा आहे, त्यांनी आपापल्या मंडळ किंवा अध्यक्षांकडे नावनोंदणी करण्याचे आवाहन नितेश राणे यांनी केले आहे.

प्रश्न व उत्तरे (FAQ's)

  1. प्रश्न: 'मोदी एक्सप्रेस' उपक्रम किती वर्षांपासून सुरू आहे? (How many years has the 'Modi Express' initiative been running?)
    उत्तर: 'मोदी एक्सप्रेस' उपक्रम गेल्या १३ वर्षांपासून सुरू आहे.

  2. प्रश्न: यंदा किती 'गणपती स्पेशल' गाड्या सोडण्यात येणार आहेत? (How many 'Ganpati Special' trains will be run this year?)
    उत्तर: यंदा दोन 'गणपती स्पेशल' गाड्या सोडण्यात येणार आहेत.

  3. प्रश्न: या विशेष गाड्यांमध्ये प्रवाशांसाठी कोणती मोफत सुविधा देण्यात येणार आहे? (What free facility will be provided to passengers in these special trains?)
    उत्तर: सर्व प्रवाशांना मोफत जेवणाची सुविधा देण्यात येणार आहे.

  4. प्रश्न: या गाड्या कोणत्या दिवशी सुटतील? (On which dates will these trains depart?)
    उत्तर: या गाड्या २३ आणि २४ ऑगस्ट २०२५ रोजी सुटतील.

  5. प्रश्न: या गाड्यांचे सुटण्याचे ठिकाण आणि वेळ काय आहे? (What is the departure place and time for these trains?)
    उत्तर: दादर स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Operation Sindoor: 'पोस्ट सोडून मुजफ्फराबादला पळा...', ऑपरेशन सिंदूरने थरारले पाकिस्तानी सैनिक; भारतीय लष्करप्रमुखांचा मोठा खुलासा

Viral Video: बर्फाचा डोंगर घेऊन निघाला...! स्कूटी चालकाची धोकादायक स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून नेटिझन्सही हैराण; तुम्ही पाहिलाय का?

Anant Chaturdashi 2025 Wishes In Marathi: बाप्पा चालले आपल्या गावाला! अनंत चर्तुदशीनिमित्त नातेवाईकांना शेअर करा 'हे' खास WhatsApp Status

बिट्स पिलानीत 20 वर्षीय विद्यार्थ्याने आयुष्य का संपवले? समोर आले कारण Watch Video

Fake IAS Officer: मुख्यमंत्री-राज्यपालांसोबत फोटो, यूपी-बिहार ते गोवापर्यंत पसरले नेटवर्क, कोट्यवधींचा घातला गंडा; बनावट आयएएस अधिकाऱ्याचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT