Shiv Sena Bhawan  Dainik Gomantak
महाराष्ट्र

'मनसे' कार्यकर्त्यांनी शिवसेना भवनाबाहेर केले हनुमान चालिसाचे पठण

शिवसेना भवनाबाहेर पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे.

Akash Umesh Khandke

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरवरून वाद वाढत आहे. राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) रामनवमीनिमित्त शिवसेना भवनाबाहेर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसाचे पठण केले. यासंदर्भातील काही छायाचित्रेही समोर आली आहेत. त्यानंतर शिवसेना भवनाबाहेर पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. (MNS workers play Hanuman Chalisa outside Shiv Sena Bhawan in Dadar)

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी मशिदींबाहेरून लाऊडस्पीकर काढून टाका, अन्यथा मशिदीसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशारा दिला होता. त्यानंतर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात कायद्याचे राज्य चालणार असल्याचे म्हटले होते.

एका सभेला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले की, "मी नमाजच्या विरोधात नाही, पण सरकारने मशिदीतील लाऊडस्पीकर हटवण्याचा निर्णय घ्यावा. मी फक्त एक इशारा देत आहे. लाऊडस्पीकर काढा नाहीतर मशिदीसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा वाजवा." ते पुढे म्हणाले, "उत्तर प्रदेशची प्रगती होत असल्याचे पाहून मला आनंद होत आहे. महाराष्ट्रातही (Maharashtra) असाच विकास हवा आहे. मला माझ्या धर्माचा अभिमान आहे."

महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी इशारा दिला होता
राज ठाकरेंनी (Raj Thackeray) लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवण्याची घोषणा केल्यानंतर मुंबईतील घाटकोपर परिसरात तसेच नाशिकमध्ये मनसे (MNS) कार्यकर्त्यांनी हनुमान चालीसा वाजवण्यास सुरुवात केली. या मुद्यावर महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT