Gold Jewellery Theft: 'आँटी' म्हणून हाक मारली, दार उघडताच चाकूचा धाक; कुंकळ्ळीत ज्येष्ठ महिलेचे दागिने लुटले

lderly Woman robbed in Cuncolim Goa: भिवसा कुंकळ्ळी येथे जुडिथ डायस या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी घडली.
lderly Woman robbed in Cuncolim Goa
Gold Jewellery TheftDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: भिवसा कुंकळ्ळी येथे जुडिथ डायस या ज्येष्ठ महिलेच्या घरात शिरून तिला चाकूचा धाक दाखवून लुबाडण्याची खळबळजनक घटना काल गुरुवारी घडली. चोरट्यांनी तिच्यावर हल्लाही केला. त्यात तिच्या नाकाला इजा झाली आहे. तिच्याकडील सोन्याचे दागिने हिसकावून चोरट्याने नंतर पळ काढला. संशयित तोंडावर मुखवटा घालून आले होते. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी होत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जुडीथ या राहत असलेल्या घराच्या बाजूलाच त्यांचे दीर व कुटुंबीय राहतात. मात्र, गुरुवारी रात्री ते कुटुंबासह सायबिणीच्या दर्शनाला गेले होते व त्या घरात एकट्याच होत्या. यावेळी दार ठोठावून त्यांना ‘आँटी’ म्हणून हाक मारली. दरवाजा उघडला असता दरवाजासमोर एक पुरुष व एक महिला चेहरा झाकून उभ्या होत्या.

lderly Woman robbed in Cuncolim Goa
North Goa Voter List Revision: उत्तर गोव्यात मतदार यादी पुनरीक्षण सुरू; दावे-आक्षेप नोंदवण्यासाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदत

त्यांनी डायस यांना चाकू दाखवून धमकावले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन, हातातील बांगडी आणि अंगठी जबरदस्तीने हिसकावून घेत दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. जुडीथ यांचे दीर व इतर कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा लुटीचा प्रकार समोर आला. या घटनेची माहिती मिळताच कुंकळ्ळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. संशयितांचा माग काढण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले. पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक किशोर वेळीप पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.