IND vs NZ: ऐतिहासिक शतक अन् 5 मोठे रेकॉर्ड! गावस्कर-सेहवागलाही जमले नाही ते केएल राहुलने केले; रचला नवा इतिहास

KL Rahul 5 Big Records: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत शतकी खेळी खेळली आणि आपल्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या भूमीवर शतक झळकावले.
KL Rahul 5 Big Records
KL Rahul Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

KL Rahul 5 Big Records: न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात केएल राहुलने दमदार फलंदाजीचे प्रदर्शन करत शतकी खेळी खेळली आणि आपल्या कसोटी कारकीर्दीत पहिल्यांदाच न्यूझीलंडच्या भूमीवर शतक झळकावले. वेलिंग्टन कसोटीतील या संस्मरणीय खेळीदरम्यान राहुलने आधी यशस्वी जयस्वालसोबत आणि त्यानंतर देवदत्त पडिक्कलसोबत महत्त्वाची भागीदारी रचत भारतीय डावाला भक्कम आधार दिला व फलंदाजी सोपी केली. या शतकासोबतच राहुलने क्रिकेटच्या इतिहासात अनेक खास विक्रमांची नोंद केली.

भारतासाठी (India) सुनील गावस्कर, वीरेंद्र सेहवाग, शिखर धवन आणि मुरली विजय यांसारख्या दिग्गज सलामीवीरांनी यश संपादन केले असले, तरी सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सलामीवीर म्हणून शतक झळकावण्याचा पराक्रम कोणीही करु शकला नव्हता. न्यूझीलंडविरुद्धच्या या शतकासह राहुल सेना देशांमध्ये सलामीवीर म्हणून शतक ठोकणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला.

KL Rahul 5 Big Records
IND vs NZ 1st Test: वेलिंग्टनमध्ये भारतीय वेगवान गोलंदाजांचा जलवा! न्यूझीलंडविरुद्ध 12 वर्षांनंतर रचला मोठा रेकॉर्ड; शानदार कामगिरीने वेधले लक्ष

याशिवाय, राहुलची कामगिरी मायदेशापेक्षा परदेशात अधिक उजवी राहिली. त्याच्या एकूण 13 कसोटी शतकांपैकी केवळ 3 शतके भारतात असून, न्यूझीलंडमधील खेळीमुळे त्याने परदेशातील 10 शतकांचा टप्पा गाठला.

KL Rahul 5 Big Records
IND vs NZ Test: हक्काची विकेट हुकल्याने गिल नाराज! फिलिप्सच्या एलबीडब्ल्यूवर हायव्होल्टेज ड्रामा; खडाजंगीचा व्हिडिओ व्हायरल

सेना देशांमध्ये कसोटी शतक नोंदवणाऱ्या मोजक्याच भारतीय खेळाडूंच्या यादीतही आता राहुलचे नाव सामील झाले. यापूर्वी मोहम्मद अझरुद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि विराट कोहली यांनी ही कामगिरी केली होती; आता राहुल हा असा पराक्रम करणारा पाचवा भारतीय फलंदाज ठरला. या शतकी खेळीच्या जोरावर राहुल जागतिक कसोटी अजिंक्यपद 2025-27 स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा भारतीय फलंदाज ठरला असून त्याने शुभमन गिलला मागे सोडले, जरी गिल लवकरच त्याला मागे टाकण्याची शक्यता असली तरी सध्या राहुल आघाडीवर आहे. तसेच, कसोटी सलामीवीर म्हणून हे त्याचे 12 वे शतक ठरले असून, याबाबतीत त्याने मुरली विजयच्या 12 शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.