पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना?

माध्यमांना जी गोष्ट आधी कळते, ती गोष्ट मुंबई पोलिसांना का नाही समजू शकली? अजित पवार
sanjay raut hand in attack on sharad pawar house or not pravin darekar
sanjay raut hand in attack on sharad pawar house or not pravin darekarDainik Gomantak
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं मुंबईतलं निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आंदोलनाचे पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तब्बर 109 आंदोलकांना अटक केली असून त्यांची रवानगी आज झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

संजय राऊतांच्या आरोपावर प्रतिक्रिया देताना राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पवारांच्या घरावरील हल्ल्यात संजय राऊतांचाच हात तर नाही ना? याचा तपास करण्याची गरज आहे, असं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. संजय राऊत (sanjay raut) यांना प्रसिद्धीची सवय आहे. त्यांची प्रॉपर्टी जप्त झाली त्यामुळे ते नैराश्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्यावरच लक्ष ठेवावं. पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे राऊतांचाच हात तर नाही ना? याची चौकशी करण्याची गरज आता निर्माण झाली आहे, असा दावा प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

sanjay raut hand in attack on sharad pawar house or not pravin darekar
XE प्रकाराने वाढवली चिंता, मुंबईत आढळला रूग्ण

गृहमंत्र्यांची याची पाळंमुळं शोधून काढावीत अशी मागणी करत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर (BJP) हल्लाबोल केला होता. राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओक या त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली होती. "पवारांच्या घरावर हल्ला करायला लावता हे पाप तुम्ही कुठे फेडाल? विरोधी पक्षाचा हा दळभद्रीपणाचा कळस आहे. सदावर्तेंना भाजपाचा पाठिंबा असून त्यांना उद्धव ठाकरे आणि शरद पवारांविरोधात (Sharad Pawar) गरळ ओकण्यासाठीच ठेवलेलं आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता.

माध्यमांना जी गोष्ट आधी कळते, ती गोष्ट मुंबई पोलिसांना का नाही समजू शकली? असा सवाल करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी पोलीस या प्रकरणाचा छडा लावतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com