Raj Thackeray And Supriya Sule Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharsahtra-Karnataka Border Dispute​: तर आमचं उत्तर पण...सीमाप्रश्नावरून राज ठाकरेंचा कर्नाटकला इशारा

कर्नाटकचे मुख्यमंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करीत आहेत - सुप्रिया सुळे

Pramod Yadav

Maharsahtra-Karnataka Border Dispute​: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन वातावरण तापलं आहे. बेळगावमध्ये महाराष्ट्राच्या गाड्या थांबवून नंबरप्लेटची तोडफोड करण्यात आली. महाराष्ट्रात देखील यावरून आता तीव्र पडसाद उमटू लागले आहेत. दरम्यान, यावरून आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray) यांनी कर्नाटक सरकारला (Karnataka) इशारा दिला आहे.

'कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.'

तसेच, 'हा प्रश्न चर्चेने आणि सामोपचाराने सुटायला हाव, पण, जर समोरून संघर्षाची कृती केली जाणार असेल तर मात्र मनसे काय करू शकते याची चुणूक माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी दाखवली आहे. त्यामुळे गरज पडली तर आमचं उत्तर पण तितकंच तीव्र असेल हे विसरू नका.' असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

मी तयार आहे.!!

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सीमावादावर आपली भूमिका मांडली. यावरून शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात जुंपली असल्याचे दिसत आहे. तोंड आवरा, नाहीतर पुन्हा तुरुंगात आराम करायला जायची वेळ येईल. असा इशारा मंत्री शंभुराज देसाईं यांनी राऊतांना दिला आहे.

यावर "शिवरायांचा अपमान सरकार सहन करत आहे. सीमा वादावर महाराष्ट्राला कर्नाटकआव्हान देत आहे.यावर प्रश्न विचारले की संजय राऊत यांना पुन्हा तुरुंगात पाठवण्याची भाषा. कायदा. न्यायालये. तपासयंत्रणा खिशात आहेत असेच शंभूराजे देसाई आणि चंद्रकांत बावनकुळे यांना म्हणायचे आहे का?मी तयार आहे.!!" असे उत्तर राऊत यांनी दिले आहे.

सीमावादाचा मुद्दा संसदेत देखील गाजला राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संसदेत या मुद्यावर भाष्य कर्नाटकचे मुख्यमंत्री दादागिरी करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT