Dabolim Airport: नौदलच मुख्य अडचण! ‘दाबोळी’ विमानतळ बंद होणार?

दाबोळी विमानतळ नौदलाकडे असल्यामुळेच येथे नागरी उड्डाणे करण्यास प्रतिबंध येत आहे.
Dabolim Airport
Dabolim Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

मोपा विमानतळ (Mopa Airport) सुरू झाल्यावर दाबोळी (Dabolim Airport) बंद होणार, ही काळ्या दगडावरील रेघ असल्याने दाबोळी विमानतळ कायम ठेवावा, अशी मागणी ‘गोवन्स फॉर दाबोळी ओन्ली’ या संघटनेचे निमंत्रक फा. एरेमितो रिबेलो यांनी केली आहे. ‘दाबोळी’ला मर्यादा येण्याचे मुख्य कारण म्हणजे या विमानतळाचा नौदलाकडे असलेला ताबा हे आहे.

Dabolim Airport
Goa Assembly: रेशन घोटाळा, PSI भरती, बेरोजगारीचा मुद्दा गाजणार; जानेवारीत विधानसभेचे हिवाळी अधिवेशन

दाबोळी विमानतळ नौदलाकडे असल्यामुळेच येथे नागरी उड्डाणे करण्यास प्रतिबंध येत आहे. त्यामुळेच मोपा सुरू झाल्यास विमान कंपन्या दाबोळीकडे पाठ फिरवतील, अशी दाट शक्यता आहे. वास्तविक दाबोळी हा कधीच सैनिकी विमानतळ नव्हता. मात्र, गोवा मुक्तीनंतर त्याचा ताबा नौदलाकडे दिला, अशी माहिती फा. रिबेलो यांनी दिली.

देशी प्रवाशांची गोची

नौदलाच्या प्रतिबंधामुळे दाबोळी विमानतळ सकाळी 8:30 ते दुपारी 12:30 पर्यंत नागरी उड्डाणासाठी बंद असते. देशी प्रवाशांसाठी ही वेळ अत्यंत महत्त्वाची असून या वेळेत हा विमानतळ बंद असल्याने एक तर पहाटे किंवा सायंकाळी उशिरा प्रवास करावा लागतो.

Dabolim Airport
Goa Congress: अपात्रता याचिका! आमदार लोबो, कामतांना सभापती तवडकरांची नोटीस

कोणाचे काय मत?

दाबोळी विमानतळावरच आमचे अस्तित्व असून ताे बंद झाल्यास मोपा येथे आमचे पुनर्वसन करावे. या संघटनेच्या दाबोळीवर सुमारे 350 टॅक्सी सुरू आहेत. ‘दाबोळी’ बंद झाल्यास आमच्यावर उपासमारीची वेळ येणार आहे. हे सर्व लक्षात घेऊन सरकारने आम्हाला मोपा विमानतळावर जागा द्यावी.

- प्रसाद प्रभुगावकर (सरचिटणीस, युनायटेड टॅक्सी वर्कर्स असोसिएशन)

‘मोपा’ सुरू झाल्यानंतर ‘दाबोळी’चा आंतरराष्ट्रीय दर्जा नष्ट झाल्यातच जमा आहे. हळूहळू याचा परिणाम व्यवसाय व उद्योगांवर होईल. जे लोक ‘दाबोळी’मुळे उपजीविका चालवत होते, त्यांच्यावर विपरित परिणाम होणार आहे. दक्षिण गोव्यातील हॉटेल व टॅक्सी व्यवसायावर बराच परिणाम होईल आणि बेकारी वाढेल. बरेच टॅक्सी व्यावसायिक कर्जबाजारी असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल.

- अरविंद शिंदे (समाजसेवक, वास्को)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com