Maharashtra Police  Dainik Gomantak
महाराष्ट्र

तब्बल 9 वर्षांनंतर अल्पवयीन मुलगी परतली घरी, शाळेतून येताना झालं होत अपहरण...

मुंबई पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तब्बल 9 वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली.

दैनिक गोमन्तक

Minor Girl Kidnapped in Mumbai: मुंबई पोलिसांनी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीची तब्बल 9 वर्षांनंतर तिच्या कुटुंबीयांशी ओळख करून दिली. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा गौर असे या अल्पवयीन मुलीचे नाव असून तिचे 2013 मध्ये घराजवळून अपहरण करण्यात आले होते. पोलिसांनी सांगितले की या प्रकरणातील अपहरणकर्ता हॅरी डिसोझा नावाचा 50 वर्षीय व्यक्ती असून त्याला अटक करण्यात आली आहे. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याला 10 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 जानेवारी 2013 रोजी पूजा अंधेरीतील गिल्बर्ट हिल येथील तिच्या शाळेतून घरी जाण्यासाठी निघाली होती पण ती घरी पोहोचलीच नाही. कुटुंबीयांनी पूजाचा सर्वत्र शोध घेतला आणि नंतर पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद करून तिचा शोध सुरू केला. पोलिसांच्या हातीही काहीच लागले नाही.

डीएन नगर पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी मिलिंद कुर्डे म्हणाले, “पूजा बेपत्ता असल्याने आम्ही तिचा शोध घेत होतो आणि आम्हाला माहिती मिळाली की ती अंधेरीतील नेहरू नगर झोपडपट्टीत एक अल्पवयीन मुलगी राहत आहे. आणि आम्हाला संशय आला की काहीतरी चुकीचे होत आहे. त्यानंतर पोलिसांनी तेथे जाऊन चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान डिसूझाने सांगितले की, त्याच्या घरात राहणाऱ्या दोन मुलींपैकी एक मुलगी त्याची नाही.

त्यानंतर आम्ही संपूर्ण कुटुंबाला पोलीस ठाण्यात आणले, जेणेकरून संपुर्ण प्रकरणाचा खुलासा होईल. 16 वर्षीय तरुणी आणि कुटुंबातील इतर सदस्यांना वेगळ्या खोलीत बसवले आणि बहुतेकांची चौकशी सुरू केली, त्यानंतर हळूहळू सत्य बाहेर येऊ लागले. आणि खुप वेळ चाललेल्या चौकशीनंतर 16 वर्षीय मुलीने सांगितले की ती पूजा आहे.

पोलिसांनी मुलीसोबत घडलेला प्रकार सांगितला

पोलीस अधिकारी कुर्डे यांनी सांगितले की, पूजाचे तिच्या शाळेजवळून आरोपी हॅरी डिसूझाने अपहरण केले आणि त्याच्या घरी नेले. त्याला मुले नसल्यामुळे पत्नी वायंकटम्मासोबत तो तिचे मुलीप्रमाणे पालनपोषन करायला लागला. मात्र, तीन वर्षांनंतर त्याला एक मुलगी झाली. यानंतर दोघांनी पूजाची पूर्वीप्रमाणे काळजी घेणे बंद केले आणि तिच्याशी गैरवर्तन करण्यास सुरुवात केली.

त्यानंतर आरोपीने पूजाला नोकर बनवले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अपहरण, चुकीच्या पद्धतीने डांबून ठेवणे आणि मुलांची तस्करी या गुन्ह्यात अटक केली आहे. पूजाच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी पोलीस ठाणे गाठून मुलाची ओळख पटवली. आणि तिला आपल्या ताब्यात घेतले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Electricity Conservation: विजेची बचत करा! शासकीय कार्यालयांना सावंत सरकारचा आदेश; नियमांचे पालन न केल्यास...

Cash For Job Scam: मंत्र्यांच्‍या कार्यालयांशी जवळीक, म्हणून अनेकजण भुलले 'श्रुतीला'; कष्टाची कमाई गमावली !

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

हायकोर्टाने तयार केलेल्या सेवाशर्तीच्या नियमात बदल; गोवा सरकारचा बचाव करणाऱ्या मुख्य सचिवांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले

Cash For Job Scam: 'प्रत्येकाला वाटतंय मीच CM, गोवा सरकारमध्ये सुरुय सर्कस, सगळे जोकर खेळतायेत'; LOP युरींची टीका

SCROLL FOR NEXT