Bhandara: 35 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार, महाराष्ट्रात सर्वत्र संतापाची लाट

सलग तीन दिवस अत्याचार, महिलेची जीवन मरणाशी झुंज
Bhandara News
Bhandara News Dainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील भंडारा (Bhandara) जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पती पासून विभक्त झालेल्या 35 वर्षीय महिलेवर सामुहिक बलात्कार (Gang Rape in Bhandara) केल्याची घटना घडली आहे. मदतीचं आश्वासन देत तीन नराधमांनी दोन ठिकाणी नेऊन महिलेवर अत्याचार केले. त्यानंतर आरोपींनी महिलेला रस्त्याकाठी फेकून देत तिथून पळ काढला. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे. पीडित महिलेवर नागपूर वैद्यकीय महाविद्यालयात (Nagpur Medical College) उपचार सुरु आहेत. (35 year old women gang raped in Bhandara, Maharashtra condemns inhuman act)

याबाबत मिळालेली अधिकची माहिती अशी की, पीडित महिला पतीपासून विभक्त झाली असून ती गोंदियामध्ये (Gondia) राहणाऱ्या तिच्या बहिणीकडे आली. 30 जुलैला बहिणीसोबत भांडण झाल्याने ती रात्रीच्या सुमारास घराबाहेर पडली. गोरेगाव, गोंदियात (Goregaon, Gondia) जात असताना रस्त्यात अज्ञात आरोपी भेटला. घरी सोडण्याच्या बहाण्यानं आरोपीने गोंदिया जिल्ह्याच्या मुंडीपार (Mundipar Forest, gondia) जंगलात नेऊन महिलेवर अत्याचार केला. दुसऱ्या दिवशीही आरोपीने महिलेवर अत्याचार केला. त्यानंतर पीडितेला तिथेच सोडून आरोपीनं पळ काढला.

Bhandara News
Michael Lobo : संसदेत गोव्याच्या बेरोजगारीचा विषय ही राज्याची नाचक्कीच!

पीडित महिला जंगलातून बाहेर पडून लाखनी, भंडारा (Lakhani, Bhandara) येथे पोहोचली. तिथे दुचाकी दुरुस्त करणाऱ्या आरोपी सोबत तिची भेट झाली. त्यांनीही घरी सोडण्याच्या बहाण्यानं पीडितेवर अत्याचार केले. आरोपीनं आपल्या एका मित्राला सोबत घेत 1 ऑगस्ट रोजी पीडीतेला निर्मनुष्य ठिकाणी नेत पीडितेवर वारंवार अत्याचार केले. त्यानंतर पीडितेला कन्हाळ मोह (Kanhal moh) गावाच्या पुलाजवळ सकाळी 8 वाजता विवस्त्र अवस्थेत सोडून तिथून पळ काढला.

पहाटे गावकऱ्यांनी पीडितेला विवस्त्र, रक्ताच्या थारोळ्यात विव्हळत असताना पाहिलं. गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल केलं. वैद्यकीय तपासणीत महिलेवर अत्याचार झाल्याचं उघडकीस आलं. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली असून एक आरोपी फरार आहे.

Bhandara News
Goa BJP : महेश आमोणकरांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

महाराष्ट्रात संतापाची लाट

भंडारा जिल्ह्यात घडलेल्या या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. बलात्काराच्या घटना या अमानुष असून यातून विकृत मानसिकतेचे दर्शन होते. भंडाऱ्यातील अत्याचाराच्या घटनेचा निषेध करावा तेवढा कमी आहे. या प्रकरणातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा करावी, अशी मागणी सामाजिक व राजकीय (leading womens in Social And political sector condemn the act) क्षेत्रात नेतृत्व करणाऱ्या महिलांनी केली आहे. पीडितेला समुपदेशन तसेच मनोधैर्य योजनेतून पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे मत महिलांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com