Mumbai Goa Highway google image
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway Block: मुंबई-गोवा महामार्गावर 4 तासांचा ब्लॉक; 'या' पर्यायी मार्गांनी करा प्रवास!

Mumbai Goa Highway: आजपासून पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

Manish Jadhav

कोकणात मागील काही दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस पडत आहे. चार दिवसांपूर्वीच कोकण रेल्वेसह मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक मुसळधार पावसामुळे ठप्प झाली होती. यादरम्यान प्रवाशांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागला होता.

यातच आता, आजपासून पुन्हा एकदा मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai Goa Highway) दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे वाहतूकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

कोलाडजवळ नवीन पूलाच्या गर्डरच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात आला असून प्रवाशांची कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही याची खबरदारी घेत पर्यायी मार्गांची सोय करण्यात आली आहे.

दरम्यान, मुंबई-गोवा महामार्गावरील कोलाडजवळ पूई येथे नवीन पूलाचं काम सध्या युद्धपातळीवर सुरु आहे. या पूलाचं गर्डर टाकण्याचे काम करण्यासाठी दोन दिवस चार तासांचा ब्लॉक घेण्यात आला आहे. हा ब्लॉक आज आणि उद्या असणार आहे.

दुपारी बारा ते सायंकाळी चार पर्यंत हा ब्लॉक असणार आहे. या दोन दिवसांसाठी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

या महामार्गावरुन दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांची (Passengers) गैरसोय होणार नाही यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करण्यास सांगण्यात आले आहे.

दुसरीकडे, मागील 12 वर्षांपासून पळस्पे ते इंदापूर मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रखडलेले आहे. रुंदीकरण पूर्ण झाले असले तरी इंदापूर टप्प्यातील पुलांची कामे रखडली आहेत. ही कामे आता मार्गी लावण्यात येणार आहेत. याचाच भाग म्हणून पूई येथील नवीन पुलाचं काम पूर्ण करण्यासाठी हालचाली सुरु आहेत.

गेल्या अनेक काळापासून मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरु आहे. या रस्त्यावरुन प्रवास करताना मुठीत जीव घेऊनच प्रवास करावा लागतो. याकडे सरकारने (Government) तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त करण्यात येते आहे.

पर्यायी मार्ग कोणते…

-वाकण पाली येथून वाहतूक भिसेखिंड, रोहा कोलाड मार्गे पुन्हा मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

-वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गासाठी पुढे जाता येईल.

-या शिवाय खोपोली, पाली, रवाळजे, निजामपूर, माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्गासाठी पुढे जाता येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sanguem: जुन्‍या पुलावर टँकर अडकताच नव्‍या पुलाचे 'धाडसी उद्‌घाटन', वाहतूक कोंडीमुळे चालकांचा सुटला संयम; सांगेतील प्रकार

Canacona: युवा पिढीसाठी गोकर्ण पर्तगाळी मठात ॲम्‍फी थिएटर, युवकांना करणार आकर्षित; 25 नोव्हेंबरपर्यंत सर्व कामांची पूर्तता

Baina Vasco Robbery Case: बायणा प्रकरणात दरोडेखोरांना फ्लॅटची इत्थंभूत माहिती कशी? मागच्या वाटेने, लिफ्टने, थेट नायक यांच्‍याच बेडरूमपर्यंत गेलेच कसे?

Zuarinagar: झुआरीनगरात उसळला आगडोंब, भंगारअड्डे भस्मसात; 'अग्निशमन'चे शर्थीचे प्रयत्न, हजारो रुपयांचे साहित्य जळून खाक

Goa Taxi: यापुढे 'लिव्‍ह अँड लायसन्‍स'वर नोंदणी नाही! व्यावसायिक वाहनांवर CM प्रमोद सावंतांचे स्पष्टीकरण; लवकरच परिपत्रक जारी होणार

SCROLL FOR NEXT