Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 3 दिवस रोज 4 तास महामार्ग राहणार बंद

Mumbai Goa Highway: 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेतले जाणार आहेत.
मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 3 दिवस रोज 4 तास महामार्ग राहणार बंद
Mumbai Goa Highwaygoogle image
Published on: 
Updated on: 

मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी समोर आली असून, तीन दिवस रोज चार तास महामार्ग बंद ठेवला जाणार आहे.

कोलाड जवळील पूई येथे पुलाच्या कामानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे. 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेतले जाणार आहेत.

वाहतूक विभागाच्या अप्पर पोलीस महासंचालकांनी याबाबतची अधिकसुचना जारी केलीय. 11 ते 13 जुलै दरम्यान सकाळी 6 ते 8 आणि दुपारी 2 ते 4 दोन टप्प्यात हे ब्लॉक घेतले जाणार आहेत. या काळात महामार्गावरील दोन्ही लेन वाहतुकीसाठी बंद असतील, प्रवाशांनी या वेळेत पर्यायी मार्गाचा अवलंब करावा अशी सूचना करण्यात आलीय.

मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, 3 दिवस रोज 4 तास महामार्ग राहणार बंद
Konkan Railway: पेडणे बोगद्यात रेल्वे रुळावर चिखल, माती; कोकण रेल्वेच्या तीन एक्सप्रेस चार तासांपासून रखडल्या

कोलाड येथील पूई पुलावर गर्डर टाकण्याचे काम 11 ते 13 जुलै दरम्यान केले जाणार आहे. या कामासाठी महामार्गावर ब्लॉक घेण्याचा निर्णय वाहतूक विभागाने घेतला आहे. मुंबई गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशी सूचना करण्यात आलीय.

हे आहेत पर्यायी मार्ग

1) वाकण - पाली - भिसेखिंड - रोहा कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्ग

2) वाकण - पाली - रवाळजे - निजामपूर - माणगाव ते मुंबई गोवा महामार्ग

किंवा

3) खोपोली - पाली - रवाळजे - निजामपूर - माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Vasco
Nitin Gadkari ashamed Mumbai Goa Highway delay
Mumbai Sawantwadi Daily Express Train Timetable
Dhyan Foundation Goa Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com