Mumbai Man Kidnapped Womans Daughter Who refused to marry Dainik Gomantak
महाराष्ट्र

"त्याला सोडून माझ्याशी लग्न कर!" प्रस्ताव नाकारणाऱ्या महिलेच्या चिमुकलीचे अपहरण, धावत्या रेल्वेच्या टॉयलेटमधून आरोपीला अटक

"आम्हाला माहिती मिळाली की आरोपीने कोलकात्याला जाण्यासाठी शालिमार एक्स्प्रेस पकडली होती आणि आमच्या टीमने इगतपुरी येथील रेल्वे पोलिसांना अलर्ट केले आणि त्यांना आरोपींबद्दल माहिती दिली.

Ashutosh Masgaunde

Man Kidnapped Womans Daughter Who refused to marry:

महिलेचा लग्नाला नकार दिला म्हणून एका ३५ वर्षीय व्यक्तीने, महिलेशी जुळवून घेण्यासाठी तिच्या पाच वर्षांच्या मुलीचे अपहरण केले.

पोलिसांनी तीन रेल्वे गाड्यांचा शोध घेतला आणि धावत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये लपून बसलेल्या आरोपीला पकडले आणि मुलीची सुटकाही केली.

आरोपी रिटन घोष हा मूळचा पश्चिम बंगालचा असून त्याला अपहरणप्रकरणी अटक करण्यात आली आहे. घोष मुलीच्या कुटुंबीयांना ओळखत होता आणि त्यांना सतत भेटायला जायचा.

५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री त्याने मुलीचे तिच्या घरातून अपहरण केले. मुलीची आई नागपाडा पोलीस ठाण्यात गेल्यानंतर, पोलिसांनी आरोपी आणि मुलीची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. आरोपी कोलकात्याला पळून जाऊ शकतो अशी शंका मुलीच्या आईला आली. त्यामुळे पोलिसांची दोन पथके सीएसएमटी आणि एलटीटीला गेली आणि मुलीचा आणि आरोपीचा शोध सुरू केला.

सहाय्यक पोलीस उपायुक्त अकबर पठाण म्हणाले, "आम्हाला माहिती मिळाली की आरोपीने कोलकात्याला जाण्यासाठी शालिमार एक्स्प्रेस पकडली होती आणि आमच्या टीमने इगतपुरी येथील रेल्वे पोलिसांना अलर्ट केले आणि त्यांना आरोपींबद्दल माहिती दिली.

ट्रेन बुलढाण्यातील शेगावजवळ पोहचेपर्यंत आम्ही मुलगी आणि आरोपीचे फोटोही रेल्वे पोलिसांना पाठवले होते. रेल्वे पोलिसांनी गाडीच्या सर्व डब्यांची झडती घेतली त्यावेळी आरोपी मुलीसोबत टॉयलेटमध्ये लपलेला आढळला," असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीला रेल्वे पोलिसांनी पकडल्यानंतर नागपाडा येथून पोलिसांचे एक पथक शेगावला गेले. त्यांनी तेथून मुलीला कुटुंबियांकडो सुपूर्द केले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

"आरोपीचे मुलीच्या आईवर एकतर्फी प्रेम होते. त्याने तिला तिच्या पतीला सोडून त्याच्याशी लग्न करण्याचा प्रस्ताव दिला होता, परंतु जेव्हा तिने त्याचा प्रस्ताव नाकारला, तेव्हा तिला धडा शिकवण्यासाठी त्याने तिच्या मुलीचे अपहरण केले," असे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT