पोलिसच निघाला सीरियल रेपिस्ट, भीती दाखवून गाडीत बसवायचा अन् करायचा अपहरण

यातील काही महिलांवरील बलात्काराची प्रकरणे 2020 पूर्वीची आहेत. अलीकडेच या नराधमाने एका महिलेचे अपहरण करत तिच्यावर बलात्कार केला होता.
Police officer PC Cliff Mitchell is accused of raping six women.
Police officer PC Cliff Mitchell is accused of raping six women.Dainik Gomantak

Police officer PC Cliff Mitchell is accused of abducting and raping six women:

पोलीस नागरिकांच्या सुरक्षेसाठी असतात. सुरक्षेऐवजी तो सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट करू लागल्यास लोकांनी कोणाकडे पाहायचेय. ब्रिटनमध्ये एका विक्षिप्त पोलीस कर्मचाऱ्याने अत्याचाराची सीमा गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लंडन एमईटी पोलीस कर्मचारी पीसी क्लिफ मिशेलने वेगवेगळ्या घटनेत 6 महिलांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप आहे. त्याला सध्या निलंबित करण्यात आले असून त्याच्याविरुद्ध चौकशी सुरू आहे.

यातील काही महिलांवरील बलात्काराची प्रकरणे 2020 पूर्वीची आहेत. 23 वर्षीय पीसी क्लिफ मिशेलने अलीकडेच एका महिलेला धमकावत हात मागे करण्यास सांगितले. यानंतर त्याने महिलेला कारमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला.

हे गुन्हे करताना तो महिलांना भीती दाखवून गाडीत बसवायचा आणि त्यांचे अपहरण करुन त्यांच्यावर बलात्कार करायचा.

एमईटी वेस्ट एरिया बेसिक कमांड युनिटमध्ये कार्यरत असलेला पोलिस कर्मचारी पीसी क्लिफ मिशेल अलीकडेच वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात हजर करण्यात आले होते.

Police officer PC Cliff Mitchell is accused of raping six women.
संतापजनक! कुत्र्याच्या पिल्लाला जबरदस्तीने बिअर पाजणाऱ्या महिलेचा व्हिडिओ व्हायरल

यावर पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी क्रॉयडन कोर्टात होणार आहे. बलात्काराच्या सहा गुन्ह्यांव्यतिरिक्त मिशेलवर जीवे मारण्याची धमकी आणि विनयभंगाचा गुन्हाही दाखल आहे.

या सर्व प्रकरणाचा तपास सुरू आहे. मिशेलने पोलिस प्रशिक्षणाची पदवी अंशतः पूर्ण केली असून आरोपांमुळे त्याला निलंबित करण्यात आले आहे.

Police officer PC Cliff Mitchell is accused of raping six women.
Weird Marriage Rituals: जगात असाही एक देश, जिथे लग्नासाठी चोरतात दुसऱ्याची बायको

एमईटीचे डेप्युटी असिस्टंट कमिशनर स्टुअर्ट कुंडे यांच्या म्हणण्यानुसार, पीसी क्लिफ मिशेल याच्यावरील आरोप अतिशय गंभीर आहेत. अशा गंभीर गुन्ह्यांच्या संशयावरून सेवारत पोलीस अधिकाऱ्याला अटक होणे अत्यंत चिंताजनक असल्याचेही यात म्हटले आहे. यामुळे लंडनमधील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे, असेही ते म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com