Dawood Ibrahim Latest News Dainik Gomantak
महाराष्ट्र

दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीवर NIA ची मोठी कारवाई, 20 हून अधिक ठिकाणांवर छापे

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घातली आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) पाकिस्तानस्थित गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या साथीदार आणि काही हवाला ऑपरेटर्सच्या विरोधात मुंबईत अनेक ठिकाणी छापे टाकले आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या नागपाडा, गोरेगाव, बोरीवली, सांताक्रूझ, मुंब्रा, भेंडी बाजार आणि इतर भागात असलेल्या ठिकाणांवर एनआयएने ही कारवाई केली आहे. अनेक हवाला ऑपरेटर आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी जोडले गेले होते आणि NIA ने फेब्रुवारीमध्ये या संदर्भात गुन्हा दाखल केला होता. त्या अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली आहे.

(Dawood Ibrahim Latest News)

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीला संयुक्त राष्ट्राने दहशतवादी संघटना घोषित करून त्यावर बंदी घातली आहे. 2003 मध्ये, संयुक्त राष्ट्रांनी 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी दाऊद इब्राहिमला जागतिक दहशतवादी म्हणून नियुक्त केले आणि त्याच्या डोक्यावर $25 दशलक्ष इनाम ठेवले. एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या प्रकरणात हा छापा टाकण्यात आला आहे, त्याच प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे. तो सध्या तुरुंगात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये केंद्रीय गृहमंत्रालयाने दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणांचा तपास एनआयएकडे सोपवला होता.

दाऊद इब्राहिम आणि त्याच्या डी-कंपनीवर भारतात टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्जची तस्करी आणि बनावट नोटा चलनात आणल्याचा आरोप आहे.

(Maharashtra Latest News)

केंद्रीय गृह मंत्रालयाने दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनीला लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद आणि अल-कायदा यांसारख्या प्रतिबंधित दहशतवादी संघटनांसोबत भारतात दहशतवादी कारवाया केल्याबद्दल दोषी आढळले आहे. दाऊद इब्राहिम आणि डी-कंपनी व्यतिरिक्त एनआयए छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची (मृत), दाऊदची बहीण हसिना पारकर (मृत) यांच्याशी संबंधित प्रकरणांची चौकशी करेल.

भारताच्या 'मोस्ट वॉन्टेड' यादीत समाविष्ट असलेला दाऊद इब्राहिम पाकिस्तानात बसून आपला अवैध धंदा चालवत आहे. भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी याबाबत अनेकदा माहिती दिली आहे की याला पाकिस्तान सरकारचा पूर्ण पाठिंबा आहे. भारताने यासंदर्भात अनेक वेळा पाकिस्तान सरकारला पुरावेही सादर केले आहेत. पाकिस्तानला सोपवण्यात आलेल्या डॉजियरमध्ये दाऊद इब्राहिमचा पूर्ण पत्ताही नमूद करण्यात आला आहे. दाऊद इब्राहिम हा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मियांदादचा चुलत भाऊही आहे. तो कराचीच्या एका पॉश भागात राहतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

ENG vs IND: "तिलक वर्माला डच्चू द्या, संजू सॅमसनला खेळवा!" इंग्लंडविरुद्धच्या सलग पराभवानंतर माजी भारतीय कर्णधाराने साधला निशाणा; मॅनेजमेंटला घेतलं फैलावर

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

SCROLL FOR NEXT