तारीख ठरली! काकांच्या अयोध्या दौऱ्यानंतर पुतण्याची वारी

शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांची अयोध्या (Ayodhya) दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे.
Raj Thackeray
Raj ThackerayDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेना नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आदित्य ठाकरे यांची अयोध्या दौऱ्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (राज ठाकरे मनसे) यांच्यानंतर श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार आहेत. राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा 5 जूनला होणार आहे. यानंतर आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्येला पोहोचतील. आज (8 मे, रविवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. त्याचवेळी संजय राऊत यांनी राज ठाकरे यांचा खरपूस समाचार घेत खोट्या भावनेने अयोध्येला जाणार्‍यांना श्रीरामाचा आशीर्वाद मिळणार नाही, असे म्हटले. राज ठाकरे राजकीय हेतूने अयोध्येला जात आहेत, तर आदित्य ठाकरे श्री रामलल्लाचे दर्शन घेणार आहेत, असे संजय राऊत म्हणाले. (Aditya Thackeray will leave for Ayodhya after Maharashtra Navnirman Sena chief Raj Thackeray's visit to Ayodhya)

संजय राऊत म्हणाले की, 'आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या (Ayodhya) दौऱ्यासाठी शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरु झाली आहे. दरम्यान, अयोध्येतील नयाघाट परिसरात शिवसेनेच्या वतीने उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचे पोस्टर आणि बॅनर लावण्यात आले आहेत. या पोस्टर्स आणि बॅनरमध्येही राज ठाकरेंना टोमणे मारण्यात आले आहेत. त्यात लिहिले आहे की, 'खरे लोक येत आहेत, खोट्यापासून सावधान!'

Raj Thackeray
...म्हणून इतर कोणीही याबाबत बोलण्याचा शहाणपणा करू नये: राज ठाकरे

राऊतांनी घेतला राज ठाकरेंचा खरपूस समाचार, म्हणाले- 'काही बोलणार नाही'

माध्यमांशी बोलताना संजय राऊत आदित्य ठाकरेंच्या (Aditya Thackeray) अयोध्या दौऱ्याबाबत म्हणाले, 'अयोध्येत शिवसेनेच्या स्वागताची तयारी सुरु झाली आहे. प्रमु राम सर्वांचे आहेत. परंतु कोणी खोट्या भावनेने गेला, राजकीय भावनेने गेला, कोणाचा अपमान करायला गेला, तर त्याचे स्वागत नाही, विरोध आहे. उद्धव ठाकरे यापूर्वीही अयोध्येला गेले आहेत.’

तारीख जाहीर केली, म्हणाले- दर्शनाला जातोय, 'राजकारण' काय करायचं?

संजय राऊत (Sanjay Raut) पुढे म्हणाले, 'आदित्य ठाकरे अयोध्येला कधी जाणार? आत्ता तुम्हाला मी सांगतोय की, आदित्य ठाकरे 10 जूनला प्रभू श्री रामाच्या दर्शनाला जाणार आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह आणि मनसेच्या फंदात पडण्याची गरज नाही. आमची भेट राजकीय नाही. आम्ही दर्शनासाठी जात आहोत. आमची श्रद्धा आहे, भावना आहे. अयोध्येत शिवसेनेच्या नावाचे बॅनर कोणी लावले, याची आम्हाला कल्पना नाही. परंतु उत्तर प्रदेशातील जनता हुशार आहे. खोट्या भावनेने तिथे जाणाऱ्यांना भगवान श्रीरामाचा आशीर्वाद मिळत नाही.'

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com