नक्षलवादी हल्ला
नक्षलवादी हल्ला  Dainik Gomantak
महाराष्ट्र

गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई, चकमकीत नक्षलवाद्यांचा बडा नेता मारला गेल्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील ग्यारापट्टीच्या जंगलात शनिवारी महाराष्ट्र पोलिसांच्या (Maharashtra Police) C-60 युनिट आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी (security forces) 26 नक्षलवादी ठार केले असून चकमकीत चार जवान जखमी झाले आहेत. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी याला दुजोरा दिला आहे.

गडचिरोली पोलिस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीमध्ये नक्षलवाद्यांचा प्रमुख मिलिंद तेलतुंबडे (Milind Teltumbde) मारला गेला असल्याचे शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे.

महाराष्ट्र पोलिसांनी शनिवारी गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांचा खात्मा केला. गडचिरोली जिल्ह्यात सकाळी सात वाजल्यापासून ही कारवाई सुरू होती. या कारवाईत 4 पोलिसही जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरने (helicopter) नागपूरला पाठवण्यात आले आहे. गडचिरोलीचे एसपी अंकित गोयल यांनी ही माहिती दिली.

महाराष्ट्र पोलिसांच्या C-60 पथकाने ही मोठी कारवाई केली आहे. 1990 मध्ये नक्षलवादी हिंसाचाराचा सामना करण्यासाठी C-60 पथक तयार करण्यात आले. नुकतेच संरक्षण मंत्री (Minister of Defense) राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनीही C60 कमांडोना क्रॅक कमांडो म्हणत त्यांचे कौतुक केले होते. या चकमकीत पोलिसांनी नक्षलवाद्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त केले आहेत. गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातील अकराबत्ती, कोटगुल परिसरातील जंगलात नक्षलवाद्यांनी छावणी उभारल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

यानंतर C-60 नावाच्या पोलिस पथकाने नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पथक शोध मोहिमेसाठी रवाना झाले. पोलिसांचे पथक तळांजवळ पोहोचताच नक्षलवाद्यांना याची माहिती मिळाली. नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्यानंतर पोलिसांनीही प्रत्युत्तर देत गोळीबार सुरू केला. बरेच तास चाललेल्या या अत्यंत महत्त्वाच्या ऑपरेशनमध्ये 26 नक्षलवादी ठार झाले.

2 लाखांचे बक्षीस आहे

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी दोन लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या मंगरू मांडवी या नक्षलवाद्याला येथून अटक केली होती. नक्षलवादी मंगरूवर खून, पोलिसांवर हल्ला असे अनेक गुन्हे दाखल आहेत. ठार झालेल्यांमध्ये काही बड्या बेनामी नक्षलवाद्यांचा समावेश असल्याचे बोलले जात आहे.

दुसरीकडे, छत्तीसगडमधील (Chhattisgarh) दंतेवाडा जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात दोन वेगवेगळ्या चकमकीत 4 नक्षलवादी ठार झाले आहेत. यापैकी 3 महिला माओवादी आहेत. या चार नक्षलवाद्यांवर छत्तीसगड सरकारने प्रत्येकी पाच लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. ठार झालेली महिला नक्षलवादी कट्टर माओवादी होती. या महिलांनी अनेक मोठ्या नक्षली कारवाईत सहभागी होत्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT