Middle East War: युद्ध थांबवण्यासाठी इराणचा 'मास्टर प्लॅन'! राष्ट्राध्यक्ष पेजेशकियन यांनी आखली लक्ष्मणरेषा; ठेवल्या 'या' 3 अटी

Masoud Pezeshkian Conditions: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी हे युद्ध संपवण्यासाठी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली असून तीन महत्त्वाच्या अटी जगासमोर ठेवल्या आहेत.
Masoud Pezeshkian Conditions
Masoud PezeshkianDainik Gomantak
Published on
Updated on

Masoud Pezeshkian Conditions: इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा आज (12 मार्च) तेरावा दिवस असून, हा संघर्ष शांत होण्याऐवजी दररोज अधिकच तीव्र होताना दिसत आहे. दोन्ही बाजूंनी सातत्याने क्षेपणास्त्रे, बॉम्ब आणि दारुगोळ्याचा वर्षाव केला जात असून संपूर्ण परिसर युद्धभूमी बनला आहे. या भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध लवकरच संपण्याचे संकेत दिले आहेत.

ट्रम्प यांनी दावा केला की, अमेरिकेने इराणमधील (Iran) आपले सर्व लष्करी लक्ष्य पूर्ण केले असून आता तिथे नष्ट करण्यासारखे काहीही उरलेले नाही. इराणची हवाई दले आणि संरक्षण यंत्रणा पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे त्यांनी म्हटले. ट्रम्प यांच्या मते, इराणने जगाचे गेली 47 वर्षे जे नुकसान केले, त्याची किंमत आता त्यांना चुकवावी लागत आहे आणि अमेरिका जेव्हा इच्छित असेल तेव्हा हे युद्ध थांबवू शकते. मात्र, हे युद्ध संपवण्यासाठी अमेरिका नेमकी कोणती रणनीती अवलंबणार, याबाबत त्यांनी अद्याप स्पष्टता दिलेली नाही.

Masoud Pezeshkian Conditions
Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

दुसरीकडे, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन यांनी हे युद्ध संपवण्यासाठी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली असून तीन महत्त्वाच्या अटी जगासमोर ठेवल्या आहेत. पेजेशकियन यांनी रशिया आणि पाकिस्तानच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरुन आपली मागणी जाहीर केली. त्यांनी म्हटले की, इस्रायल आणि अमेरिकेने सुरु केलेले हे युद्ध थांबवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे इराणच्या कायदेशीर अधिकारांना मान्यता देणे, आतापर्यंत झालेल्या नुकसानीची भरपाई देणे आणि भविष्यात इराणवर पुन्हा अशा प्रकारचे आक्रमण होणार नाही, याची आंतरराष्ट्रीय स्तरावर ठोस लेखी हमी मिळणे. जोपर्यंत या अटींची पूर्तता होत नाही, तोपर्यंत युद्धविराम कठीण असल्याचे त्यांनी सूचित केले.

Masoud Pezeshkian Conditions
Iran US War: ''सार्वभौमत्वावर घाला घालाल तर...'' इराणी राष्ट्राध्यक्षानं ट्रम्पला दिला सज्जड दम; 'आर-पार'च्या लढाईचा व्यक्त केला निर्धार!

त्याचवेळी, युद्धाच्या या रणधुमाळीत इस्रायलने आपला मोर्चा लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या तळांकडेही वळवला आहे. इस्रायली हवाई दलाने लेबनॉनची राजधानी बेरुतवर भीषण हल्ला केला असून दक्षिण बेरुतचा बुर्ज अल-बरजनेह हा परिसर पूर्णपणे उद्ध्वस्त केला. या हल्ल्यानंतर रहिवासी भागातून प्रचंड स्फोटांचे आवाज ऐकू येत असून अनेक इमारतींना आग लागली.

Masoud Pezeshkian Conditions
Israel Attack On Iran: क्षेपणास्त्रांचा मारा अन् सायरनचा आवाज...! इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; बॅलिस्टिक मिसाइल्सनी हादरलं 'तेहरान' VIDEO

लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या धक्कादायक आकडेवारीनुसार, 2 मार्चपासून सुरु झालेल्या या इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 600 हून अधिक नागरिकांचा बळी गेला, ज्यामध्ये 86 मुले आणि 47 महिलांचा समावेश आहे. तसेच 1444 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मध्यपूर्वेतील ही परिस्थिती सध्या अत्यंत नाजूक बनली असून जागतिक महासत्तांच्या भूमिकेकडे आणि इराणच्या अटींवर अमेरिका काय प्रतिसाद देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com