Chhattisgarh: नक्षलवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक, दोन नक्षलवादी ठार

जिल्ह्यातील कोंटा पोलीस स्टेशन (Conta Police Station) परिसरातील गोमपाड (Gompad) आणि कन्हैगुडा गावांमधील जंगलात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.
Chhattisgarh
ChhattisgarhDainik Gomantak
Published on
Updated on

छत्तीसगडच्या (Chhattisgarh) नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यात (Sukma District) सुरक्षा दलाने चकमकीत दोन नक्षलवाद्यांना (Naxalites) ठार केले आहे. सुकमा जिल्ह्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, जिल्ह्यातील कोंटा पोलीस स्टेशन परिसरातील गोमपाड आणि कन्हैगुडा गावांमधील जंगलात सुरक्षा दले आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी ठार झाले.

कोंटा पोलीस स्टेशन परिसरात नक्षलवादी कारवायांची माहिती मिळाल्यानंतर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या डीआरजी आणि कोब्रा बटालियनचे (Cobra Battalion) एक पथक या भागात गस्तीवर पाठवण्यात आल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, जेव्हा टीम गोमपाड आणि कन्हैगुडा गावांच्या दरम्यान जंगलात होती, तेव्हा माओवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केला, त्यानंतर सुरक्षा दलांनीही प्रत्युत्तर दिले.

Chhattisgarh
Jammu and Kashmir: श्रीनगरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

शस्त्रे आणि स्फोटके जप्त

काही वेळ दोन्ही बाजूंनी गोळीबार केल्यानंतर नक्षलवादी तेथून पळून गेले, त्यानंतर जेव्हा सुरक्षा दलांनी घटनास्थळाचा शोध घेतला तेव्हा तेथे दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह, शस्त्रे आणि स्फोटके सापडली. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, घटनास्थळी रक्ताच्या खुणा मोठ्या प्रमाणात आढळल्या.

Chhattisgarh
Jammu Kashmir- 24 तासात 5 अतिरेक्यांचा खात्मा

अनेक नक्षलवादी जखमी झाल्याची शक्यता

चकमकीत इतर अनेक नक्षलवादी जखमी होण्याची शक्यता आहे. ते म्हणाले की, चकमकीत मारल्या गेलेल्या माओवाद्यांची ओळख पटू शकली नाही पण त्यापैकी एक कोन्टा क्षेत्राचा एएलओएस कमांडर क्वासी हंगा असावा. या घटनेबाबत अधिक माहिती घेतली जात असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. परिसरात नक्षलवाद्यांविरोधात कारवाई सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com