'Samruddhi Mahamarg
'Samruddhi Mahamarg Dainik Gomantak
महाराष्ट्र

PM मोदींच्या हस्ते लोकार्पण होणाऱ्या 'Samruddhi Mahamarg' चे वैशिष्ट्ये कोणती, वाचा एका क्लिकवर

दैनिक गोमन्तक

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. नागपूर दौऱ्यावर येत असलेले पंतप्रधान मोदी हे मेट्रो ट्रेनमधून प्रवास करणार आहेत. लोकार्पणानंतर समृद्धी महामार्गावरून देखील प्रवास करणार आहेत. या समृद्धी महामार्गाची वैशिष्ट्ये काय आहेत हे जाणून घेउया.

Samruddhi Mahamarg चे वैशिष्ट्य

-701 कि.मी.चा मार्ग आहे.

- 17 तास प्रवासाचे अंतर 7 तासांवर येणार आहे.

- देशातील सर्वांत मोठा हरित मार्ग, 11 लाख वृक्ष दोन्ही बाजुंनी असणार आहे.

- राज्यातील एकूण 36 टक्के लोकसंख्येला या महामार्गाचा लाभ होणार आहे.

- प्रकल्प खर्च : 55,355 कोटी झाला आहे.

- 10 जिल्ह्यातील, 26 तालुक्यातील 391 गावातून जाणार आहे.

- देवेंद्र फडणवीस यांची संकल्पना, मुख्यमंत्री असतानाच केले काम सुरू होते.

- आमदार असतानापासून नागपूर-मुंबई अंतर कमी करण्याचे होते स्वप्न. प्रत्यक्ष मुख्यमंत्री झाल्यावरच ते साकार करता आले.

- या प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जातीने लक्ष दिले.

- त्याकाळी स्थापन मुख्यमंत्री वॉर रुमचा सुद्धा हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प. दर टप्प्याला आणि गतिमान आढावा घेतला जायचा.

- त्यामुळेच अल्पावधीत हा प्रकल्प पूर्ण करता येणे शक्य.

- संपूर्ण राज्यासाठी विकासाचे नवे दालन खुले होणार आहे.

- सहा पदरी असणार मार्ग/150 कि.मी. वेगाने वाहन क्षमता असणार आहे.

- नागपूर ते शिर्डी मार्ग पूर्ण, त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी 11 ला लोकार्पण करणार आहे.

- उर्वरित 181 कि.मी. पुढच्या 6 महिन्यात पूर्ण होणार आहे

- 14 जिल्हे पोर्टने जोडले जाणार आहे.

- प्रतिदिवशी 30 ते 35 हजार वाहने धावणार आहे.

- शिर्डी, वेरुळ, लोणार, अजंता, एलोरा, संभाजीनगर, पंचवटी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे.

- या मार्गावर 9 ठिकाणी इंधन भरण्याची सुविधा/20 इंधन स्टेशन्स रस्त्याच्या लगत असणार आहे.

- 18 कृषी समृद्धी केंद्रांची या महामार्गाभोवती निर्मिती होणारआहे.

- या महामार्गाला जोडून दुष्काळी भागात 1000 नवीन शेततळी/चेकडॅम्स उभारले जाणार आहे.

- या प्रकल्पाला लागून असलेल्या सौर उर्जा सुविधांमधून 138.47 मे.वॅ. सौर उर्जा निर्माण होणार आहे.

- सर्वाधिक गतीने पूर्ण झालेले भूसंपादन : 8800 हेक्टर जागा अवघ्या 12 महिन्यात भूसंपादन

- यासाठी 8003.03 कोटी रुपये भूसंपादनापोटी राज्य सरकारने दिले आहे.

- हा महामार्ग 3 अभयारण्यातून जाणार. काटेपुर्णा (अकोला), कारंजा (वाशीम), तेन्सा (ठाणे). त्यामुळे या भागात प्राण्यांना कोणतीही हानी होऊ नये, म्हणून अंडरपास

- असे एकूण 209 अंडरपास

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Video: CM सावंत यांनी पुन्हा घडवलं माणुसकीचं दर्शन; अपघात पाहताच तात्काळ थांबवला ताफा

Margao News : मडगावसह परिसरात १२,९८९ वाहतूक नियमभंगाची प्रकरणे नोंद; सर्वाधिक गुन्‍हे नो एन्ट्रीत प्रवेश करणाऱ्यांचे

Margao: मडगाव पोलिस स्टेशन समोरच स्वत:ला भोकसले, परप्रांतीय व्यक्ती गंभीर जखमी

Vasco News : मुरगावात मान्सूनपूर्व कामे रखडली; पालिकेला मुहूर्त मिळेना

Lok Sabha Elections : अतिआत्मविश्वास कधीच बाळगला नाही : डॉ. दिव्या राणे

SCROLL FOR NEXT