Bollywood King movie update
Bollywood King movie updateDainik Gomantak

"मी शाहरुखसोबत काम केलं कारण...", अर्शद वारसीने 'किंग' सिनेमाबाबत केले मोठे वक्तव्य; आर्यनबाबत म्हणाला की ' तो तर........'

Bollywood King movie update: बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने अलीकडेच शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटात आणि आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पदार्पण प्रोजेक्टमध्ये काम करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
Published on

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने अलीकडेच शाहरुख खानच्या ‘किंग’ चित्रपटात आणि आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पदार्पण प्रोजेक्टमध्ये काम करण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे. स्क्रिप्टपेक्षा खान कुटुंबाशी असलेले नाते आणि मैत्री हेच आपल्या निर्णयामागचे प्रमुख कारण असल्याचे त्याने सांगितले.

अर्शदने सांगितले की, आर्यन खानने भूमिका ऑफर करताच त्याने कोणताही विलंब न लावता होकार दिला. “मी आर्यनसाठी केलं आणि ‘किंग’साठी केलं कारण मला आर्यन आणि शाहरुख आवडतात. ते लोक मला आवडतात. त्यांनी विचारलं तर मी नक्की करेन,” असे स्पष्ट शब्दांत त्याने म्हटले.

Bollywood King movie update
Dhurandhar 2 ने रिलीजपूर्वी तोडले सर्व रेकॉर्ड! मिळवले बक्कळ पैसे; एवढ्या किमतीत विकले OTT Rights

आर्यन खानच्या दिग्दर्शनातील पहिल्या प्रोजेक्ट ‘द बास्टर्ड्स ऑफ बॉलिवूड’मध्ये अर्शदने अंडरवर्ल्ड डॉन गफूर इस्माईलची भूमिका साकारली. नेटफ्लिक्सवरील या मालिकेत त्याच्या विनोदी टायमिंगचे विशेष कौतुक झाले. या मालिकेत लक्ष्य, सहर बंबा, अन्या सिंग, रजत बेदी, मोना सिंग, राघव जुयाल आणि बॉबी देओल यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. तर इमरान हाश्मी आणि शाहरुख खान यांची खास केमिओ उपस्थितीही पाहायला मिळाली.

Bollywood King movie update
सिनेमासृष्टीत मोठे वादळ! 'हे' 2 सुपरस्टार येणार एकत्र; सोबत तिसरे मोठे नावही जोडले जाणार

अर्शद वारसीच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये मैत्री आणि वैयक्तिक नात्यांना किती महत्त्व दिले जाते, याची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com